ट्विटरने पुन्हा सस्पेंड केलं अभिजीतचं नवं अकाउंट

ट्विटरने पुन्हा सस्पेंड केलं अभिजीतचं नवं अकाउंट

सोमवारी अभिजीतनं ट्विटरवरील आपल्या नवीन अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून असं म्हटलं होतं की, 'काही लोक माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. मी त्या लोकांच्या विरोधात आहे, जे देश आणि भारतीय सेनेच्या विरोधात बोलतायत.'

  • Share this:

30 मे : गायक अभिजीत यांचं दुसरं ट्विटर अकाउंटही ट्विटरने सस्पेंड केलंय. असं करत ट्विटरने सोमवारपासून पुन्हा एकदा ट्विटरवर येण्याच्या अभिजीतच्या इच्छेला  धक्का दिलाय. मागच्याच आठवड्यात ट्विटरवरून आक्षेपार्ह आणि अश्लील टीका केल्यामुळे अभिजीतचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यावेळी या गायकाने म्हटलेलं की, 'राष्ट्रविरोधी लोक माझा आवाज दाबू शकत नाहीत.'

खरं तर 23 मे रोजी या अभिजीत यांनी जेएनयूची विद्यार्थिनी आणि कार्यकर्ता असलेल्या शहला राशिद यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली होती. या सर्व प्रकारानंतर ट्विटरने या महाशयांचं अकाउंटच डिलीट केलं होतं.

सोमवारी अभिजीतनं ट्विटरवरील आपल्या नवीन अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून असं म्हटलं होतं की, 'काही लोक माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. मी त्या लोकांच्या विरोधात आहे, जे देश आणि भारतीय सेनेच्या विरोधात बोलतायत.'  त्याचं नवं अकाऊंट होतं @singerabhijeet.

पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्यावर केलेली आक्षेपार्ह टीका हेही अभिजीतचं याअगोदरचं अकाउंट बंद करण्याचं महत्त्वाचं कारण होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2017 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading