ट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल

मुंबईहून उडणाऱ्या विमानांनमध्ये सुरक्षिततेसाठी ज्या काही वस्तू ठेवता त्याचबरोबर एक ओडोमॉसदेखील ठेवा. आत्ताच सात मच्छर मारले आहेत' असं ट्विंकलने ट्विट केलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:31 PM IST

ट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल

22 एप्रिल : अभिनेत्री ट्विंकल खन्नाने नुकतंच एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर ट्विट केलं आहे. 'मुंबईहून उडणाऱ्या विमानांनमध्ये सुरक्षिततेसाठी ज्या काही वस्तू ठेवता त्याचबरोबर एक ओडोमॉसदेखील ठेवा. आत्ताच सात मच्छर मारले आहेत' असं ट्विंकलने ट्विट केलं आहे.

ट्विंकलच्या या ट्विटनंतर युजर्सनी तिला गमतीशीर कमेंट केल्यात. एका युजर्सने तर 'स्वत:चे ओडोमॉस स्वत: आणा अशी कमेंट केली आहे. तर काही युजर्सनी ट्विंकलने तिच्या ट्विटमध्ये एअरलाइन्सचं नाव का नाही टाकलं असा प्रश्न देखील विचारला आहे.

एका युजरने लिहिलं की, 'तुझ्या देशभक्त नवऱ्याला आता यावरही एखादा सिनेमा करायला सांग.' दुसऱ्या एका युजरने मजेशीर अंदाजात लिहिले की, 'तुम्हाला सात खून माफ झाले आहेत. आता तुम्ही एअरलाइन्सकडून अजून काय अपेक्षा करता.'

एका युजरने लिहिले की, 'तू हुशार आहे जी त्या एअरलाइन्सची तक्रार नाही केलीस. नाही तर एअरलाइन्सचे कर्मचारी तुझ्यावर नाराज झाले असते आणि तुझ्या नवऱ्याने ते विमानच तुझ्यासाठी विकत घेतले असते.'

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2018 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...