• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO : फोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम

VIDEO : फोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम

फोर्ब्सने यावर्षीची टॉप 100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली. ज्यात अक्षय कुमार 33 व्या क्रमांकावर आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 जुलै : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. बॉटल कॅप चॅलेजनंतर फोर्ब्सच्या यादीत नाव आल्यावर अक्षयच्या नावाची चर्चा सर्वत्र झाली. मात्र फोर्ब्स यादीत नाव झळकल्यानंतरही अक्षय कुमार खूश नसल्याचं नुकत्याच एका व्हिडिओमुळे समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कशाप्रकारे जास्त पैसे कमवत असतो हे दिसत आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नानं हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यामुळे अक्षयची पोलखोल झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन मासिक फोर्ब्सने यावर्षीची टॉप 100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींची यादी जाही केली. ज्यात अक्षय कुमार 33 व्या क्रमांकावर आहे. मात्र यामुळे अक्षय अजिबात खुश नाही. त्याला अजून पैसे कमावायचे आहेत. ज्यामुळे तो असं काही करत आहे जे पाहून सर्वच चकित झाले आहेत. ट्विंकल खन्नानं शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे अक्षय कुमार एका रॉडला लटकलेला दिसत आहे. या रॉडला ठरवून दिलेल्या वेळापर्यंत लटकून राहिल्यास अक्षयला 100 पाउंड मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे अक्षयनं असं केलं सुद्धा. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ट्विंकलनं अशाप्रकारे रॉडला लटकून अक्षयने 100 पाउंड म्हणजेच 8500 रुपये कमवले आहेत. असं सांगितलं आहे. याशिवाय फोर्ब्सच्या यादीत नाव येऊनही तो खूश नसल्यानं तो अशाप्रकारे आणखी पैसे कमवत असल्याचं ट्विंकलनं म्हटलं आहे. दीपिकाची बहीणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण
   
  View this post on Instagram
   

  Just hanging in there! Not happy with hitting the Forbes list- he wants to make a quick 100 pounds here as well :) #GoofingAround

  A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

  फोर्ब्सने यावर्षीची टॉप 100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली. ज्यात अक्षय कुमार 33 व्या क्रमांकावर आहे. ही यादी जून 2018 ते जून 2019 ची आहे. या दरम्यान या सेलिब्रिटींनी कलेल्या कमाईच्या आधारे ही यादी बनवण्यात आली आहे. यानुसार आक्षयाची एकूण कमाई जवळपास 422 कोटी म्हणजेच  65 मिलियन डॉलर आहे. यातील खास गोष्ट अशी आहे की, अक्षय टॉप 100 च्या यादीत समावेश असलेला बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे. यंदाच्या या लिस्टमध्ये सलमान शाहरुख सारखे अभिनेते गायब आहेत. मागील वर्षी सलमान या यादीत 82 व्या क्रमांकावर होता. 'कोणत्याही पक्षात जाणार नाही', पण कंगनाने केली मोदींची स्तुती
  अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘मिशन मंगल’ येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगाला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात अक्षय सोबत विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, कृति कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा आणि शरमन जोशी अशी तगडी स्टार कास्ट आहे. याशिवाय सध्या अक्षयनं सूर्यंवशीचं शूट सुरू केलं आहे. प्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज ======================================================================= SPECIAL REPORT: टेमघर धरणाची गळती थांबली? जलसिंचन विभागाच्या दाव्याची पोलखोल
  Published by:Megha Jethe
  First published: