...म्हणून कतरीना म्हणते 'मला ट्विंकल खन्नाची भीती वाटते'

...म्हणून कतरीना म्हणते 'मला ट्विंकल खन्नाची भीती वाटते'

कतरीनानं आतापर्यंत अक्षय सोबत 'नमस्ते लंडन', 'वेलकम', 'सिंग इज किंग' या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रीमध्ये भांडण असल्याचं आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं. पण बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला दुसऱ्या एका अभिनेत्रीची भीती वाटते हे क्वचितच ऐकीवात आहे. पण असं घडलंय अभिनेत्री कतरीना कैफच्या बाबतीत. सिनेमांच्या शूटिंगच्यावेळी अ‍ॅक्शन सीन्सना न घाबरणारी कतरीना अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाला मात्र खूप घाबरते. याचा खुलासा खुद्द कतरीनानंच एका शो दरम्यान केला.

नुकत्याच बॉलिवूडमध्ये पार पडलेल्या एका अवॉर्ड शो फंक्शनमध्ये कतरीनानं तिला ट्विंकल खन्नाची भीती वाटत असल्याचं कबूल केलं. ती म्हणाली, 'मी आज इथं येण्यापूर्वी याच गोष्टीबद्दल विचार करत होते की, या ठिकाणी ट्विंकल खन्ना उपस्थित असू नये. कारण तिच्यामुळे मी लगेचच नर्व्हस होते.' कतरीनानं यावेळी तिला ट्विंकलचं बोलणं खूप आवडत असल्याचंही सांगत ट्विंकल प्रति प्रेमही व्यक्त केलं. तसेच ती एक विश्वासू व्यक्ती असल्याचंही सांगितलं.
 

View this post on Instagram
 

भारत


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सध्या कतरीनानं अक्षय कुमार सोबत सुर्ववंशी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली असून या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे. जवळपास 10 वर्षांनंतर कतरीना आणि अक्षय एकत्र काम करणार आहेत. 2010मध्ये त्यांनी फराह अख्तरच्या 'तीस मार खां' या सिनेमात काम केलं होतं. कतरीना आणि अक्षय बॉलिवूडमधील सुपरहिट जोड्यांपैकी मानली जाते. या दोघांनीही एकत्र 'नमस्ते लंडन', 'वेलकम', 'सिंग इज किंग' या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.
 

View this post on Instagram
 

Love is nothing but a play of Dopamine, it’s the staying in like that requires great skill #weddingrevelries


A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on


प्रियांकाची फॅशन सोडा, निकच्या मनगटावरचं घड्याळ पाहा; किंमत ऐकून व्हाल थक्क


Met Gala 2019 प्रियांकाच्या त्या विचित्र लुकनंतर दीपिकाबरोबरचा हा फोटो व्हायरल, दोघींच्या लुकची होतेय तुलना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 10:22 PM IST

ताज्या बातम्या