निवडणुकीच्या वातावरणात ट्विंकल खन्नाही नाही मागे, 'अशी' घेतली अरविंद केजरीवालांची फिरकी

संपूर्ण देशभरात निवडणुकीचं वातावरण असताना ट्विंकलनं केलेलं एक ट्वीट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 06:41 AM IST

निवडणुकीच्या वातावरणात ट्विंकल खन्नाही नाही मागे, 'अशी' घेतली अरविंद केजरीवालांची फिरकी

मुंबई, 20 एप्रिल : अभिनेत्री ट्विंकल सध्या लेखनाव्यतिरिक्त काही सिनेमांची निर्मिती करत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. राजकीय मुद्द्यांवर ती अनेकदा आपली मतं स्पष्टपणे मांडताना दिसते. काही वेळा यावरून वाद होतात तर काही वेळा तिचं कौतुकही होतं. संपूर्ण देशभरात निवडणुकीचं वातावरण असताना, ट्विंकलनं केलेलं एक ट्वीट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचं हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ट्विंकलनं नुकताच एक फोटो ट्विटरवर शेअर केला, जो पाहिल्यावर त्या फोटमधील व्यक्तीचा चेहरा दिसत नसला तरी त्यात तिची मुलगी नितारा असल्याचा अंदाज लावला जात आहे. या मुलीनं चेहऱ्यावर अंडरविअर घातली असून ट्विंकलनं ती केजरीवालांची चाहती असल्याचं म्हटलं आहे.Loading...

ट्विंकलनं ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोला, 'जेव्हा तुम्ही केजरीवालांचे चाहते असता आणि तुमच्याकडे माकड टोपी नसते.' असं कॅप्शन दिलं आहे. त्यासोबतच 'शप्पथ मी तिला असं करण्यासाठी सांगितलेलं नाही' असंही तिनं लिहिलं आहे. या ट्वीटद्वारे ट्विंकलनं अरविंद केजरीवालांची फिरकी घेतली आहे. ट्विंकलच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युझरनं तर चक्क, 'पण ज्या अंडरविअरची अक्षय कुमार जाहीरात करतो तो हा ब्रँड नाही'अशी प्रतिक्रिया दिली आहे.काही दिवसांपूर्वी ट्विंकलनं स्वतःचाच एक विचित्र ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिनं, 'आशा करते की तुम्हाला माझा हा नवा फोटो आवडेल.' असं कॅप्शन दिलं होतं. ट्विंकलनं पुढे लिहिलं, हे खूप दुर्मिळ आहे. जे या फोटोग्राफरनं कॅप्चर केलं आहे. माझा आत्मा हेच सांगू इच्छित आहे. मी आशा करते की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझा हा फोटो मोठ्या फ्रेममध्ये सजवला जाईल आणि त्याच्या चारी बाजूंना फुलांची सजावट केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 06:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...