मल्लिका-अक्षय वादावर ट्विकलनं सोडलं मौन

मल्लिका-अक्षय वादावर ट्विकलनं सोडलं मौन

विनोद या विनोदाच्या अंगानेच घ्यायला हवा असं मत ट्विंकलने याबाबत केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये व्यक्त केलंय.

  • Share this:

30 आॅक्टोबर : अक्षय कुमार आणि मल्लिका दुआ यांच्यातल्या वादाबाबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने आपलं मौन सोडलंय. विनोद या विनोदाच्या अंगानेच घ्यायला हवा असं मत ट्विंकलने याबाबत केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये व्यक्त केलंय.

अक्षयने या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य हे मल्लिका तू घंटा वाजव मी तुला वाजवतो अशा विनोदी अर्थाने म्हटलं होतं. जे पुरूष किंवा स्त्री म्हणून नव्हे सरसकट कुणालाही उद्देशून म्हणता येईल. त्यामुळे याबाबत नाहक वाद घडवण्यात अर्थ नाही.

रेड एफएमची टॅगलाईनही बजाते रहो अशी आहे. मात्र ती कुणालाही उद्देशून ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे अक्षयच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मत ट्विंकलने व्यक्त केलंय.

First published: October 30, 2017, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading