S M L

...आणि ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट एक प्रेमकथा-भाग 2' चा लूक

गंमत म्हणजे हा फोटो कुठल्या अभिनेत्याचा फोटो नोही किंवा एखादं पोस्टरही नाही. ट्विंकलने एक समुद्र किनाऱ्यावरचा सेल्फी काढला आहे. या फोटोत सकाळी समुद्र किनाऱ्यावर एक माणूस त्याचं रोज सकाळची नित्य कर्म करताना दिसतोय

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 19, 2017 05:46 PM IST

...आणि ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट एक प्रेमकथा-भाग 2' चा लूक

मुंबई,19 ऑगस्ट: मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या टॉयलेट एक प्रेमकथाने आतापर्यंत जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अक्षय कुमारच्या पत्नीने म्हणजेच ट्विंकलने एक फोटो शेअर करून आता 'टॉयलेट एक प्रेम कथा भाग 2' ची घोषणा केली आहे.

गंमत म्हणजे हा फोटो कुठल्या अभिनेत्याचा फोटो नोही किंवा एखादं पोस्टरही नाही. ट्विंकलने एक समुद्र किनाऱ्यावरचा सेल्फी काढला आहे. या फोटोत सकाळी समुद्र किनाऱ्यावर एक माणूस त्याचं रोज सकाळची नित्य कर्म करताना दिसतोय. हा फोटो तिने फेसबुकवर शेअर केला आहे आणि लिहिलं आहे टॉयलेट एक प्रेमकथा पार्ट 2चा पहिला सीन. अर्थातच ट्विंकल गंमत करते आहे. या आधीही जेव्हा टॉयलेट एक प्रेम कथा बॉक्स ऑफिसवर हिट झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवरच कॉन्स्टीपेशन संपवायला टॉयलेटचीच गरज होती असं ट्विंकलने ट्विट केलं होतं.


पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित असलेल्या टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाचा लोकांवर काही खास परिणाम होतो आहे असं तरी दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 05:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close