VIDEO : लोकप्रिय इशिता बहू किचनमध्ये काय करते ते पहा

VIDEO : लोकप्रिय इशिता बहू किचनमध्ये काय करते ते पहा

टीव्हीची लोकप्रिय बहू दिव्यांका त्रिपाठी छोट्या पडद्यावर नेहमीच सगळ्यांचं मनोरंजन करत असते. याशिवाय ती सोशल मीडियावरही तिचे काही फोटोज पोस्ट करत असते.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी : टीव्हीची लोकप्रिय बहू दिव्यांका त्रिपाठी छोट्या पडद्यावर नेहमीच सगळ्यांचं मनोरंजन करत असते. याशिवाय ती सोशल मीडियावरही तिचे काही फोटोज पोस्ट करत असते.

नुकताच दिव्यांकानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात ती किचनमध्ये दिसतेय.

हा व्हिडिओ तिच्या भोपाळच्या घरी शूट झालाय. त्यात स्वयंपाकघरात ती काॅफी बनवतेय. ते पाहून तिची आई खूप खूश होतेय. व्हिडिओ बनवताना तिची आई तिच्याशी गप्पाही मारताना दिसतेय.


दिव्यांका काॅफी मगमध्ये पाणी टाकते. आधीच त्यात काॅफी टाकलेली असते. दिव्यांका मग काॅफीचे घुटके पित पित हसताना दिसतेय.

दिव्यांकानं या व्हिडिओखाली चांगली कॅप्शन लिहिलीय. तिनं म्हटलंय, माझी आई नेहमीच मला कॅमेऱ्यात बंदिस्त करते. मी नेहमीच तिला असं करण्यासाठी नाही म्हणते. पण तरीही ती करते आणि नंतर तो व्हिडिओ पाहायला मजा येते.


दिव्यांका 'बनूं मैं तेरी दुल्हन'मुळे लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘ये है मोहब्बतें'मध्ये तिला इशिताची भूमिका मिळाली. तिनं 2016मध्ये अभिनेता विवेक दहियाशी लग्न केलं.


तरुणींच्या हृदयाची धडकन सुयश टिळकचं होतंय आगमन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 06:01 PM IST

ताज्या बातम्या