पुन्हा एकदा ऐकू येणार 'टप्पू के पापा', 'Tarak Mehta...'च्या जेठालालला भेटली नवी 'दया'

पुन्हा एकदा ऐकू येणार 'टप्पू के पापा', 'Tarak Mehta...'च्या जेठालालला भेटली नवी 'दया'

'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी दीर्घकाळापासून मालिकेत दिसली नाही आहे. मात्र जेठालालचा एका नवीन दयाबेन बरोबरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीचे आहे. दरम्यान जेठालाल आणि दयाबेन यांना विशेष प्रेम मिळालं. मात्र 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानी जवळपास 3 वर्ष दिसली नाही आहे. ती परत येणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. नवरात्रीच्या एपिसोडमध्ये दयाबेन कमबॅक करणार असल्याचा चर्चा सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये आहेत.

दिशा 2008 पासून या शोमध्ये आहे. 2017 मध्ये लग्नानंतर ही यात दिसली नव्हती. तिची मुलगी स्तुतीच्या जन्मानंतर तिने यातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर अनेकदा ती कमबॅक करणार असल्याच्या चर्चा झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाचे निर्माते असीत कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी देखील अद्याप काही निश्चित नसल्याचे म्हटले होते. मीडिया अहवालांच्या मते मेकर्स दिशा वकानीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

(हे वाचा-बॉबी देओलची वेब सीरिज 'आश्रम' अडचणीत, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या अटकेची मागणी)

नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यातून असे वाटते आहे की जेठालालला त्याची नवीन दया मिळाली आहे. एवढेच नव्हे तर या शोचे निर्माते यांनी देखील या नवीन दयाला शोमध्ये घेण्याची मागणी केली आहे.

हा व्हिडीओ या आठवड्यातील इंडियाज बेस्‍ट डांसर (India's Best Dancer) या सेटवरील आहे. यावेळी 'तारक मेहता..' ची संपूर्ण टीम इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये पोहोचली आहे. यावेळी कोरिओग्राफर ऋतुजा जुन्नरकर हिने दयाबेनची भूमिका करत डान्स परफॉरमन्स केला आहे. यामध्ये ती जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांना 'टप्पू के पापा' म्हणून देखील हाक मारते. तिचा हा परफॉरमन्स सर्वांनाच आवडला आहे. रुतुजाला 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये पाठवा अशी गंमतीशीर मागणी शोच्या निर्मात्यांनी केली आहे.

View this post on Instagram

Daya bhabhi bann kar jab #RutujaTheBest ne lagayi ‘Ae Haalo’ ki pukaar, jhoom uthe Tappu ke papa aur #TaarakMehtaKaOoltahChashmah ka pura parivaar! Tune in to #IBDxTMKOC special, this Sat-Sun at 8 pm, on Sony TV. #IndiasBestDancer @rutuja.junnarkar @ashish_patil2501_official @terence_here @geeta_kapurofficial @malaikaaroraofficial @bharti.laughterqueen @haarshlimbachiyaa30 @maakasamdilipjoshi @mmoonstar @realmandarchandwadkar @amitbhattmkoc @lodha_shailesh @jsonalika @tan_mahashabde @shyampathakpopu @jennifer_mistry_bansiwal @sunayanaf @raj_anadkat @samayshah_5 @ballusuri @palaksidhwani @mayur_vakani @nirmalsoni1 @hasmukhi @priyaahujarajda @iamazharshaikh @kushahh_ @officialsharadsankla19 @tanmayvekaria @jatin.bajaj @officialasitkumarrmodi @tarrakmehtakaooltachashma @taarakmehtakaooltahchashmahnfp

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on

यावेळी ऋतुजा आणि दिलीप जोशी यांनी गरबा देखील केला आहे. हा एपिसोड शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. दरम्यान या एपिसोडच्या ट्रेलरला एवढी प्रसिद्धी मिळाल्याने प्रेक्षक मुळ एपिसोडसाठी उत्सुक आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 28, 2020, 6:03 PM IST

ताज्या बातम्या