मोदींची मिमिक्री भोवली, श्याम रंगिलाला 'लाफ्टर चॅलेंज'मधून वगळलं

मोदींची मिमिक्री भोवली, श्याम रंगिलाला 'लाफ्टर चॅलेंज'मधून वगळलं

"श्याम रंगिलाचा परफॉर्मन्स चांगला नव्हता म्हणून त्याला काढून टाकण्यात आलं"

  • Share this:

27 आॅक्टोबर : अक्षय कुमारच्या 'दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' हा शो दिवसेंदिवस वादात अडकत चालला आहे. मल्लिका दुवाच्या वादानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणाऱ्या

श्याम रंगिला शो मधून काढून टाकण्यात आलंय.

एका वेबसाईटवर दिलेल्या मुलाखतीमध्ये श्याम रंगिलाने सांगितलं की, स्टार प्लसच्या शोमुळे मला खूप त्रास झाला. त्या शोमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली नक्कल शो मधून काढून टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याच्यावर मोदींच्या नकला करण्यावरुन निर्बंध घालण्यात आले आहेत.

त्याला स्पष्ट शब्दात बजावण्यात आलं आहे की, तो मोदींची नक्कल करु शकत नाही. पण त्याला राहुल गांधींचा आवाज काढण्याची मुभा आहे. शुटिंगच्या अवघ्या दोन दिवसाआधी त्याला सागंण्यात आलं की, तो राहुल गांधींची ही नक्कल नाही करु शकत.

याचा परिणाम त्याचा परफॉर्मन्सवर झाला आणि त्याला शोमधून काढून टाकण्यात आलं.

तो ऑडिशन देऊन नाही आला नाही तर त्याला या शोमध्ये खासकरुन बोलावण्यात आलं होतं असंही तो म्हणाला. त्यांने याच शोमध्ये मोदींची मिमिक्री केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्याम रंगीला एक कलाकार आहे आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे तो नाराज आहे. तो म्हणाला की 'मी आधीच खूप त्रासात आहे. मी मागच्या एक-दोन महिन्यापासून खूपच अस्वस्थ आहे.'

शो आणि चॅनेलने सांगितलं की, श्यामचा परफॉर्मन्स चांगला नव्हता म्हणून त्याला काढून टाकण्यात आलं. 21 ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या शोमध्ये श्याम रंगीलाचा शो परफॉर्मन्स होता, जो आता काढून टाकण्यात आला आहे.

First published: October 27, 2017, 9:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading