• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • करण मेहराला येतेय मुलाची आठवण; जुना VIDEO शेयर करत म्हणाला...

करण मेहराला येतेय मुलाची आठवण; जुना VIDEO शेयर करत म्हणाला...

करणने मुलासाठी एक खास भावुक अशी पोस्ट केली होती. इन्स्टाग्रामवर मुलाचा जुना व्हिडीओ शेयर करत करणने मुलाला बघण्याची धडपड व्यक्त केली होती.

  • Share this:
    मुंबई, 15 ऑगस्ट- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’(Ye Rishta Kya Kahalata Hai) फेम नैतिक(Naitik) म्हणजेच अभिनेता करण मेहरा(Karan Mehra) आणि पत्नी निशा रावलमध्ये सध्या जोराचा वाद सुरु आहे. निशाने तर चक्क करणवर मारहाणीचा आरोप केला होता. तसेच मुंबई पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. या सर्व प्रकरणानंतर निशा आणि करण विभक्त राहतात. या दोघांचा एक मुलगासुद्धा आहे. त्याचं नाव काविश असं आहे. आणि तो निशासोबत राहतो. नुकताच करणने मुलासाठी एक खास भावुक अशी पोस्ट केली होती. इन्स्टाग्रामवर मुलाचा जुना व्हिडीओ शेयर करत करणने मुलाला बघण्याची धडपड व्यक्त केली होती.
    करण मेहराने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला होता. हा व्हिडीओ त्याचा मुलगा काविशचा होता. हा एक जुना व्हिडीओ होता. यामध्ये बापलेकरामधील म्हणजेच करण आणि काविशमधील घट्ट नातं स्पष्ट दिसत होतं. करणने व्हिडीओ शेयर करत म्हटलं होतं, ‘तुला पाहून 75 दिवस झाले छोटा मेहरा, आणि पुढे अजूनही दिवस मी मोजत आहे’. (हे वाचा:पुलकित-कृतीचा रोमँटिक अंदाज; पूल PHOTO होतायंत VIRAL  ) या व्हिडीओमध्ये करण काविशसोबत खेळताना दिसून येत आहे. यामध्ये काविश खूपच लहान दिसत आहे. या व्हिडीओमध्ये छोटा काविश आपल्या डोक्यावरील टोपी काढून करणच्या हातात देतो आणि परत ती घेऊन आपल्या डोक्यावर चढवतो असा हा गोड व्हिडीओ आहे. करणचा हा व्हिडीओ त्याच्या कलाकार मित्रांनादेखील पसंत पडत आहे. (हे वाचा:'सिंघम' फेम काजल अग्रवालला पाहण्यासाठी तुफान गर्दी; फॅन्सना आवरणं झालं कठीण ) पोलीस तक्रारीनंतर निशाने एका मुलाखतीमध्ये करणवर आरोप करत म्हटलं होतं, की ‘करणने मला भिंतीवर आपटल आणि मला इजा पोहचवली’. तर दुसरीकडे करणने मुलाखती देत स्पष्ट केल होतं, की ‘निशा खोटं बोलत आहे. तिने मला शिवीगाळ केली. आणि स्वतःचं डोक भिंतीवर आपटून स्वतःला इजा करून घेतली’. या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपाने सर्वच लोक बुचकळ्यात पडले होते. तसेच मुंबई पोलिसांनी करणला अटकदेखील केली होती. मात्र काही तासांच्या विचारपूसनंतर तिला जामीनवर सोडण्यात आलं होतं.
    Published by:Aiman Desai
    First published: