मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तारक मेहता... फेम सोनूची तलावात डुबकी, निधी भानुशालीचा सैराट VIDEO झाला VIRAL

तारक मेहता... फेम सोनूची तलावात डुबकी, निधी भानुशालीचा सैराट VIDEO झाला VIRAL

तारक मेहता..मध्ये निधी भानुशालीने सोनूची भूमिका साकारली होती.

तारक मेहता..मध्ये निधी भानुशालीने सोनूची भूमिका साकारली होती.

तारक मेहता..मध्ये निधी भानुशालीने सोनूची भूमिका साकारली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 जून-  सब टीव्हीवरील(Sab Tv) ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Oolta Chashma)  मध्ये अनेक वर्ष सोनूची(Sonu)  व्यक्त्रीरेखा साकारणारी निधी भानुशाली(Nidhi Bhanushali) सध्या आपल्या शिक्षणावर लक्ष देत आहे. सोबतचं आपलं खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे. ती मालिकेपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यामतून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. त्यामुळेच ती सतत चर्चेत असते.

नुकताच निधीने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना देखील खुपचं पसंत पडत आहे. या व्हिडीओमध्ये निधी एका जंगलाच्या मधोमध एका तलावात स्विमिंग करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये निधी पहिला आजुबाजूचं जंगल आणि मग त्याच्या मधोमध असणारं तलाव दाखवताना दिसत आहे. पुढच्या दृश्यामध्ये निधी स्वतः पाण्यात उतरून स्विमिंगचा आनंद घेताना दिसत आहे.

निधीच्या या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. तर 500 च्या वर कमेंट्ससुद्धा आल्या आहेत. निधी इन्स्टाग्रामवर खुपचं लोकप्रिय आहे. ती आपल्या सिंगिंगचे तसेच डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून दाद देत असतात.

(हे वाचा:'उरी'मुळे यामी गौतमला मिळाला आदित्य; पाहा दोघांची प्यार वाली लव्हस्टोरी  )

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका खुपचं लोकप्रिय आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा तितकीच पसंत केली जाते. निधी भानुशालीने या मालिकेमध्ये आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांच्या मुलीची म्हणजेच सोनूची भूमिका साकारली होती. निधी जवळजवळ 6 वर्षे या मालिकेत काम करत होती. मात्र नंतर तिने आपल्या शिक्षणासाठी ही मालिका सोडली होती.

First published:

Tags: Tarak mehta ka ooltah chashmah