गोकूलधाममध्ये उत्सुकतेचं वातावरण; आसित मोदी जेठालालला देणार सरप्राईज

गोकूलधाममध्ये उत्सुकतेचं वातावरण; आसित मोदी जेठालालला देणार सरप्राईज

तारक मेहतामध्ये होणार दयाबेनची वापसी ? आसित मोदींच्या त्या फोनमुळ गोकूलधामवासीयांची उत्कंठा पोहोचली शिगेला.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(tarak mehata ka oolta chashma) ही मालिका लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती मालिका बनली आहे. ही एक विनोदी मालिका (comedy show)आहे. यातील प्रत्येक पात्र चाहत्यांचा मनात बसलं आहे. आणि मालिकेचं सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे ‘दयाबेन’(dayaben) होय. मात्र 2017 पासून दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी(disha vakani) मालिकेत दिसत नाहीय. त्यामुळे चाहते थोडे दुखी आहेत. अनेकवेळा दयाबेन परत येणार अशा चर्चा सोशल मीडियावर होतं असतात. मात्र शेवटी असं काहीच होतं नाही. त्यामुळे चाहतेसुद्धा दयाबेन कधी येणार या विचारणे वैतागले आहेत. मात्र नुकताच मलिकचे निर्माते असित मोदी (producer asit modi )यांनी दयाबेनच्या परतण्याचे पुसटसे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चाहते आनंदी झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sony SAB (@sonysab)

या मालिकेचा एक नवा प्रोमो सध्या प्रदर्शित झाला आहे. यामध्ये गोकुळधाम मधील सर्व पुरुष मंडळी बसलेले असतात. आणि अचानक निर्माते असित मोदी यांचा फोन येतो. फोनवर ते जेठालालची विचारपूस करतात. आणि  एक ‘गुडन्यूज’ असल्याचं सांगतात. मात्र काय गुडन्यूज आहे ते उद्या सांगणार असं म्हणतात. अशा पद्धतीचा प्रोमो सध्या व्हायरल होतं आहे. त्यामुळे ही गुडन्यूज कदाचित ‘दयाबेन’तर नसेल ना? हा अंदाज वर्तविला जात आहे.

(अवश्य वाचा: फेशियल ट्रिटमेंटमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था; PHOTO पाहून बसेल शॉक)

दयाबेन न परतण्यामागे काय आहे नेमकं कारण?

दिशाला आपल्या मनासारखं मानधन मिळत नसल्यानं ती मालिकेत परतत नसल्याचं सांगण्यात येत  आहे. एका अहवालानुसार दिशा मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 1.25 लाख रुपये इतकं मानधन घेत होती. त्यांनतर तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे तिनं काही दिवसांची विश्रांती घेतली होती. आता मालिकेत परतण्यासाठी दिशाला प्रत्येक भागासाठी 1.50 लाख रुपये इतकं मानधन हवं आहे. त्याचबरोबर तिला कामाच्या वेळेत सुद्धा थोडी मुभा हवी आहे. दिशाच्या म्हणण्यानुसार तिला 11 ते 6 या वेळेत चित्रीकरण पूर्ण करायचं आहे. त्यांनतर तिला आपल्या मुलीला वेळ द्यायचा आहे. मात्र कलाकरांना वेळेची मर्यादा ठेवता येत नसल्याचं म्हटलं जातंय. दिशाच्या या अटी शो मेकर्सनां अजून मान्य नाहीत. आता निर्मात्याने दिलेलली ‘गुडन्यूज’ नेमकी दयाबेनचं आहे का हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Published by: Aiman Desai
First published: April 19, 2021, 7:30 PM IST

ताज्या बातम्या