Home /News /entertainment /

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'दयाबेन' पुन्हा दिसणार पण एका नव्या रूपात

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'दयाबेन' पुन्हा दिसणार पण एका नव्या रूपात

'तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील (taarak mehata ka oolta chashma) मधील दयाबेन (Dayaben) म्हणजेच दिशा वकानी (Disha vakani) नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  मुंबई, 12 एप्रिल : टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा’ (taarak mehata ka oolta chashma) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या मालिकेत दयाबेन (Dayaben) पुन्हा दिसून येणार आहे पण एका नव्या रूपात. समोर आलेल्या माहितीनुसार ही मालिका लवकरच अॅनिमेटेड (animation) रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोनी टीव्हीनं इन्स्टाग्राम वर पोस्ट केला होता. त्यामध्ये दयाबेन, जेठालाल, टप्पू, बाबूजी हे सर्व लोक ऍनिमेटेड अवतारात दिसून आले होते. त्यामुळे चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sony YAY! (@sonyyay)

  दिशा वकानी 2017 पासून या मुख्य मालिकेत दिसून आलेली नाही. 2017 मध्ये दिशा गरोदर होती त्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. समोर आलेल्या माहितीनुसार दिशा वकानी मानधनाच्या मुद्द्यामुळे मालिकेत परतत नसल्याचं सांगण्यात येतं आहे. परत येण्यासाठी तिनं मानधन वाढवून मागितलं आहे. दिशा एका भागासाठी तब्बल 1.25 लाख रुपये मानधन आकारते मात्र आता ती 1.50 लाख रुपयांची मागणी करत आहे.तसंच चित्रीकरणासाठी 11 ते 6 अशी निश्चित वेळ मागत आहे. जेणेकरून तिच्या मुलीला वेळ देता यावा. मात्र शोमेकर्सनी ही बाब अजूनतरी मान्य केली नाही. त्यामुळे दिशा सध्या मालिकेत दिसून येत नाही. शिवाय ती परतणार नसल्याचंही म्हटलं जात होतं. त्यामुळे चाहत्यांना खूपच वाईट वाटलं होतं. मात्र अॅनिमेटेडमध्ये तर दयाबेन दिसणार म्हणून चाहते थोडे सुखावले आहेत. हे वाचा - दत्ता सतत दारू का पितो?; ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये येणार नवा ट्विस्ट आजतक या वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत निर्माता असित मोदी यांनी म्हटलं आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र माझं असंही एक स्वप्न होतं की लहान मुलांसाठी अॅनिमेशन रुपात सुद्धा ही मालिका आणावी आणि यासाठी मी खूप दिवसांपासून या प्रयत्नात होतो. सोनी असोसिएशनमुळे माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. आता दयाबेन आपल्याला या माध्यमातून खळखळून हसायला भाग पडणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Tarak mehta ka ooltah chashmah, Tv shows

  पुढील बातम्या