'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेत्याला आला अर्धांगवायुचा झटका, डॉक्टरने रुग्णालयात भरती करण्यास केली मनाई

'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेत्याला आला अर्धांगवायुचा झटका, डॉक्टरने रुग्णालयात भरती करण्यास केली मनाई

ड्रायव्हर सकाळी आशीषच्या घरी गेला तेव्हा त्याला आशीष म्हणाले की त्यांचा उजवा हात काम करत नाहीये. गेल्या दोन वर्षांत त्यांच्यासोबत हे दुसऱ्यांदा झालं आहे.

  • Share this:

टीव्ही आणि सिनेअभिनेते आशीष रॉय यांना अर्धांगवायूचा झटका आला. स्पॉटबॉय या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आशीष यांना चित्रीकरणासाठी बाहेर जायचे होते. यासाठी त्यांनी ड्रायव्हरला फोन करून त्यांना पिकअप करायला सांगितलं.

आशीष यांचा ड्रायव्हर जेव्हा त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की आशीष यांना अजिबात चालता येत नाहीये. त्यांनी चालण्याचा प्रयत्न केला मात्र तेव्हा त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले.

आशीष यांची ही अवस्था पाहून ड्रायव्हरने त्यांना जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात नेले. आशीष यांच्या तब्येतीबद्दल त्यांची सहकारी टीना घई आणि जया भट्टाचार्य यांना कळले त्या तातडीने रुग्णालयात पोहोचल्या. याबद्दलची माहिती निर्मात्या विंता नंदा यांनी त्यांच्या फेसबुकवर अकाऊंटवर शेअर केली.

स्पॉटबॉयशी बोलताना टीना म्हणाल्या की, ‘जेव्हा ड्रायव्हर सकाळी आशीषच्या घरी गेला तेव्हा त्याला आशीष म्हणाले की त्यांचा उजवा हात काम करत नाहीये. गेल्या दोन वर्षांत त्यांच्यासोबत हे दुसऱ्यांदा झालं आहे. दुसऱ्यांदा त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. सध्या ते वेंटिलेटवर नसले तरी त्यांची उजवी बाजू काम करत नाही. त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींसोबत ते बोलत आहेत. त्यांच्या मेंदूची तपासणी करण्यात आली आहे.’

मीडिया रिपोर्टनुसार डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भरती करून घेण्यास नकार दिला होता. रुग्णासोबत त्याचे कोणतेही नातेवाईक नसल्यामुळे ते आशीष यांना भरती करून घेत नव्हते. मात्र टीना आणि जया यांनी फार समजावल्यानंतर आशीष यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. आशीष यांनी ‘रीमिक्स’, ‘बा बहू और बेबी,’ ‘ससुराल सिमर का’ अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.

Special Report : मुख्यमंत्र्यांच्या 'स्मार्ट सिटी'त ठेकेदारांकडून नियम धाब्यावर

First published: January 23, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या