Home /News /entertainment /

‘लिटल चॅम्प’ फेम राशी पगारेची बहीण आहे प्रसिध्द अभिनेत्री; जाणून घ्या जोडीबद्दल

‘लिटल चॅम्प’ फेम राशी पगारेची बहीण आहे प्रसिध्द अभिनेत्री; जाणून घ्या जोडीबद्दल

राशी याआधी आपल्या बहिणीसोबत ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये सहभागी झाली होती.

    मुंबई, 5 जुलै-  नुकताच झी मराठी वाहिनीवर ‘लिटल चॅम्प’(Little Champ Marathi) हा सिंगिंग शो सुरु झाला आहे. यामधून छोटे गायक आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करत आहेत. तसेच इतक्या लहान वयात असणाऱ्या या अद्भुत कौशल्याने सर्वांनाचं आश्चर्यचकित करत आहेत. शोमध्ये प्रत्येक छोटा स्पर्धक आपल्या निराळ्या कौशल्याने परीक्षक आणि दर्शकांचं मन जिंकत आहे. यामधीलचं एक चिमुकली म्हणजे राशी पगारे (Rashi Pagare) होय. राशीप्रमाणेचं तिची बहीणसुद्धा एक उत्तम गायिका तर आहेच शिवाय एक प्रसिध्द बाल कलाकारसुद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत या बहिणी. ‘लिटल चॅम्प’ मध्ये झळकत असलेली राशी पगारे ही मूळची नाशिकची आहे. राशी याआधी आपल्या बहिणीसोबत ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये सहभागी झाली होती. तिच्या बहिणीचं नाव आहे, सृष्टी पगारे. सृष्टी ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये शेवटच्या 10 स्पर्धकांमध्ये होती. ती या शोमध्ये खुपचं लोकप्रिय झाली होती. यानंतर तिला ‘स्वामिनी’ या प्रसिध्द मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये सृष्टीने माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई पेशवेंची भूमिका साकारली होती. या मालिकेने सृष्टीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. (हे वाचा:VIDEO: सई लोकूरची जंगलसफारी; पतीसोबत बनवला मजेशीर रील) सृष्टीनंतर आत्ता बहीण राशीसुद्धा प्रसिद्धी मिळवत आहे. तिने आपल्या पहिल्याच गाण्यात स्केटिंगवरून येत सर्वांनाचं अवाक् केलं होतं. सध्या या शोला मोठी लोकप्रियता मिळत आहे. या शोमध्ये परीक्षक म्हणून असणारे कलाकार याच मंचावरून पुढे गेले आहेत. रोहित राऊत, आर्या आंबेकर,कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा ‘लिटल चॅम्प’ हा पर्व खुपचं गाजला होता. आणि म्हणूनचं आज हे कलाकार या ठिकाणी परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi entertainment, Zee Marathi

    पुढील बातम्या