• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सवाई भट्ट झळकणार अल्बममध्ये; हिमेश रेशमियाने केली घोषणा

सवाई भट्ट झळकणार अल्बममध्ये; हिमेश रेशमियाने केली घोषणा

सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘इंडियन आयडॉल 12’ नेहमीचं चर्चेत असतं.

 • Share this:
  मुंबई, 29 जून-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) मधून आपल्या भरदार आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा स्पर्धक सवाई भट्ट (Savai Bhatt)  नुकताच शोमधून बाहेर झाला. त्यामुळे त्याचे चाहते खुपचं नाराज झाले होते. मात्र सवाईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सवाई भट्ट लवकरच इंडियन आयडॉल परीक्षक आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियासोबत (Himesh Reshmmiya) एका अल्बममध्ये झळकणार आहे.
  सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘इंडियन आयडॉल 12’ नेहमीचं चर्चेत असतं. कधी स्पर्धकांनामुळे कधी परीक्षकांमुळे तर कधी वादविवादांमुळे. नुकताच स्पर्धक सवाई भट्ट शोमधून बाहेर झाल्यामुळे हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. सवाईच्या चाहत्यांनी शोवर आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र सवाईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सवाई हिमेश रेशमिया यांच्यासोबत एका अल्बममध्ये झळकणार आहे. स्वतः हिमेश यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
  हिमेश रेशमिया यांनी नुकताच आलेल्या दोन अल्बम्सच्या तुफान यशानंतर आत्ता सवाई भट्टसोबत एका अल्बमची घोषणा केली आहे. आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘हिमेश के दिल से’ असं या अल्बमचं नाव आहे. ही माहिती समजताच सवाईचे चाहते आनंदी झाले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात कमेंट्स करून आपला आनंद व्यक्त करत आहेत. (हे वाचा:अनुष्का शर्मा प्रेग्नन्सीमधील कपड्यांची करणार विक्री; वाचा काय आहे कारण) सवाई भट्ट शोमधून बाहेर झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. शोमेकर्सवर सुद्धा जोरदार टीका केली होती. तसेच शोमध्ये पक्षपात होतं असल्याचंदेखील चाहत्यांनी म्हटलं होतं. तसेच चाहत्यांनी शो फिक्स असल्याचादेखील आरोप केला होता
  Published by:Aiman Desai
  First published: