'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेमुळे आदिती प्रसिद्धीत आली आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेमुळे आदिती प्रसिद्धीत आली आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 जून- मालिकांमध्ये मुख्य कलाकार जितके प्रसिद्ध होतात, तितकेच खलनायकसुद्धा प्रसिद्धीच्या झोतात येतात. मात्र बऱ्याचवेळा हे कलाकार आपल्या मालिकेतील रोलमुळे खाजगी आयुष्यात ट्रोल होतं असतात. असचं काहीसं झालंय ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla)  मालिकेतील मालविका (Malvika) म्हणजेच अभिनेत्री आदिती सारंगधरसोबत (Aditi Sarangdhar). पाहूया काय घडलंय नेमकं.
    झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका प्रेक्षकांना खुपचं आवडत आहे. एकीकडे स्वीटू आणि ओमची लव्हस्टोरी चाहत्यांना आवडत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये अडचणी निर्माण करणारी ओमची बहीण मालविकासुद्धा भाव खावून गेली आहे. तिचा अभिनय इतका खरा वाटतो की प्रेक्षक तिला रियल लाईफमध्ये सुद्धा ट्रोल करत आहेत. मालविका म्हणजेच अभिनेत्री आदिती सारंगधरला ‘मालविका’ ने जितकी प्रसिद्धी मिळवून दिली तितकीच तिची इमेज नेगेटिव्हसुद्धा केली आहे, असचं म्हणाव लागेल. मालविकाच्या व्यक्तिरेखेमुळ आदितीला खऱ्या आयुष्यात प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. मालविकाला सतत सोशल मीडियावरसुद्धा ट्रोल करण्यात येत आहे. (हे वाचा:VIDEO: 'माझा होशील ना', सईच्या मदतीसाठी आला डॅडा; मात्र घडलं भलतच  ) माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, दररोज घडणाऱ्या यासर्व प्रकारामुळे मालविका म्हणजेच आदितीने सोशल मीडियावरून निरोप घ्यायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील घडणाऱ्या गोष्टींमुळे प्रेक्षक तिच्या सोशल मीडियावर कमेंट करून तिला दोष देत आहेत. आणि ट्रोल करत आहेत. यासर्व गोष्टींमुळे आदिती अखेर सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. सध्या तिचा अकाऊंट सक्रीय आहे. मात्र लवकरच ती सोशल मीडियाला रामराम करत आहे. (हे वाचा:पाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL  ) ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमध्ये आदितीने मालविका म्हणजेच ओमच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. ती खुपचं श्रीमंत घरातील मुलगी असते. तिला आपल्या पैशांचा मोठा माज असतो. ती स्वीटूला आणि तिच्या कुटुंबाला नेहमीच अपमानित करत असते. आणि त्यांचा चेष्टा करत असते. तसेच ओम आणि स्वीटूला वेगळं करण्यासाठी धडपडत असते. अशी एकंदरीत मालविकाची व्यक्तीरेखा आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: