मुंबई, १० सप्टेंबर- 'तुझी माझी रेशीमगाठ' (Tuzi Mazi Reshimgath) मालिकेत नेहाला (Neha) आपल्यासाठी आणि परीसाठी(Pari) नवीन घराचा शोध घेत आहे. तिला घर शोधण्यासाठी यश मदत करत आहे. मात्र ती नवऱ्याशिवाय एकटी राहणार हे लोकांना पचत नाहीय. त्यामुळे तिला घर मिळण्यास कठीण होत आहे. आणि म्हणून यश (Yash) आपण नेहाचा नवरा असल्याचं घर मालकाला सांगतो. यांनतर पुढे काय घडणार पाहणं महत्वाचं ठरेल.
View this post on Instagram
नुकताच झी मराठीवर 'तुझी माझी रेशीमगाठ' हि मालिका आपल्या भेटीला आली आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर आपली पकड बनवली आहे. मालिकेत नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि यश म्हणजेच अभिनेता श्रेयश तळपदे यांनी भूमिका साकारल्या आहेत. नेहा हि लग्न झालेली मात्र नवरा सोडून गेलेली एक साधी स्पष्ट आणि प्रेमळ मुलगी असते. तिला परी नावाची एक गोंडस मुलगी असते.
(हे वाचा:गणपती बाप्पा मोरया! सिद्धार्थ-मितालीचं लग्नानंतर पहिलं गणेशोत्सव)
तर दुसरीकडे यश एका मोठ्या उद्योगाचा मालक असतो. तो आपल्या आजोबांसोबत तसेच काका-काकींसोबत राहात असतो. त्याच्याकडे ५०० कोटींची संपत्ती असते. त्याच्याच कंपनीत नेहा काम करत असते.याच कंपनीमध्ये काही घोटाळा होत आहे का हे पाहण्यासाठी यशसुद्धा एक एम्प्लोइ बनून येतो. आणि तो नेहाच्या जवळ येऊ लागतो. अशी हि कथा दाखवण्यात येत आहे.
(हे वाचा:'सर्वात मोठा आनंद' म्हणत, रवी जाधवने स्वतः साकारली बाप्पाची सुंदर मूर्ती)
नुकताच मालिकेचा नवा प्रोमो आला आहे. यामध्ये नेहाला आपलं आधीचं घर सोडावं लागत. त्यामुळे ती नवीन घराचा शोध घेत आहे. यामध्ये यश तिला मदत करत आहे. सर्व घर मालक यशला नेहाचा नवरा समजतात. मात्र जेव्हा नेहा त्यांना सांगते, कि त्याचा नवरा नाही. आणि ती नवऱ्याशिवाय एकटी राहणार आहे. तेव्हा सर्वजण घर देण्यास नकार देतात. म्हणून यश एका घरमालकाला नेहाचा नवरा अशी ओळख करून देतो. यावर नेहाला आश्चर्य वाटत. या एका खोटं बोलण्यानं नेहा आणि यशच्या आयुष्यात कोणतं संकट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.