• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: अशी मिळाली होती श्रीकृष्णची भूमिका, वाचा नितीश भारद्वाज यांचा अनोखा किस्सा

HBD: अशी मिळाली होती श्रीकृष्णची भूमिका, वाचा नितीश भारद्वाज यांचा अनोखा किस्सा

नितीश भारद्वाज(Nitish Bhardwaj) त्यांना आजही महाभारतातील(Mahabharat) श्रीकृष्ण(Shri Krushna) या नावानेचं ओळखलं जात.

 • Share this:
  मुंबई, 2 जून-  एखाद्या कलाकाराची भूमिका आयुष्यभर लक्षात राहावी ही फार मोठी गोष्ट असते. काही कलाकारांना हे भाग्य लाभत त्यामधीलचं एक कलाकार म्हणजे नितीश भारद्वाज(Nitish Bhardwaj). त्यांना आजही महाभारतातील(Mahabharat)  श्रीकृष्ण(Shri Krushna) या नावानेचं ओळखलं जात. हसरा चेहरा असणारे श्रीकृष्ण आजही जसेच्या तसे डोळ्यासमोर येतात. आज अभिनेता नितीश भारद्वाज आपला 58 वा वाढदिवस (Birthday)  साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया कशी मिळाली होती त्यांना श्रीकृष्णची भूमिका. दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात घर करून राहिली आहे. मात्र या व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची निवड सुद्धा तितकीच मजेशीर आहे. यामध्ये श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा लोकांना खुपचं पसंत पडली होती. ती भूमिका अभिनेता नितीश भारद्वाज यांनी साकारली होती.
  नितीश भारद्वाज यांची निवड कशी झाली याबद्दल सांगताना ते म्हणतात, त्यांना प्रथम विदुरच्या भूमिकेसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यांनी जावून स्क्रीन टेस्टची तयारी केली. तोपर्यंत एक अभिनेता विदुरच्या गेटअपमध्ये तयार होऊन त्यांच्या समोर आला. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी याबद्दल विचारणा केली. (हे वाचा:HBD: तेजश्री प्रधान आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला  ) त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आलं की तू 23-24 वर्षांचा आहेस. आणि काही दिवसांत विदुर वृद्ध होणार , त्यामुळे ही भूमिका तुझासाठी योग्य नाही. आणि हे ऐकून नितीश यांचा मूड ऑफ झाला. (हे वाचा:HBD: 'फॅशन डिझायनर कशी झाली अभिनेत्री', वाचा सोनाक्षी सिन्हाचा अनोखा किस्सा  ) त्यानंतर काही दिवसांनी त्यांना चक्क श्रीकृष्णच्या मुख्य भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल. कारण त्यांना वाटत होतं की ही भूमिका खुपचं जबाबदारीची आहे. आणि त्यासाठी अजून त्यांच्याकडे इतका आत्मविश्वास नाहीय. मात्र बी.आर.चोप्रा यांनी स्वतः त्यांना फोन केला, आणि त्यामुळे त्यांना स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. आणि यामध्ये त्यांची निवडसुद्धा झाली.
  Published by:Aiman Desai
  First published: