‘टीव्ही अभिनेत्री निया शर्माने दुसऱ्या अभिनेत्रीला केलं KISS, होळी पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

‘टीव्ही अभिनेत्री निया शर्माने दुसऱ्या अभिनेत्रीला केलं KISS, होळी पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

ही काही पहिली वेळ नाही जेव्हा नियाने रेहानाला अशाप्रकारे किस केलं असेल. 'जमाई राजा'च्या सेटवर दोघींनी एकमेकांना किस केल्यामुळे चर्चेत आले होते.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च- टीव्ही अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्डनेस आणि निर्भिड अंदाजासाठी ओळखली जाते. ती आशियातील सर्वात सेक्सी अभिनेत्रीही होती. नियाने बोल्ड सीनने परिपूर्ण असलेल्या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. अशा या बोल्ड अँड ब्युटिफुल निया शर्माचा होळीमधला एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये निया होळी पार्टीत तिच्या सह- अभिनेत्रीला किस करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ आणि फोटो निया शर्माच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नियाचा हा अंदाज पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे झाले असे की, टीव्ही कलाकार मिळून रंगपंचमी साजरी करत होते. या पार्टीत निया आणि जमाई राजा मालिकेतील तिची सहकलाकार रेहाना पंडित एकत्र मीडियाशी बोलायला आले. दोघांनी कॅमेऱ्यांसमोर एकमेकांना लिपलॉक किस केलं.

ही काही पहिली वेळ नाही जेव्हा नियाने रेहानाला अशाप्रकारे किस केलं असेल. 'जमाई राजा'च्या सेटवर दोघींनी एकमेकांना किस केल्यामुळे चर्चेत आले होते. सध्या नियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर 'ट्विस्टेड' या वेब- सीरिजमध्ये नियाने ऑनस्क्रीन को- स्टार ईशा शर्माला किस केलं होतं. सोशल मीडियावर याची चर्चाही खूप झाली होती.

नियाने ‘काली- एक अग्नीपरीक्षा’ या मालिकेतून आपल्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली होती. पण नियाला खरी ओळख ‘एक हजारों में मेरी बहना है ‘या मालिकेतून मिळाली. तर ‘जमाई राजा’ या मालिकेमुळे ती यशाच्या शिखरावर पोहोचली. निया यानंतर ‘खतरों के खिलाडी’ या रिअलिटी शोमध्ये दिसली होती.

VIDEO: महिलेची छेड काढणाऱ्या साधूला नागरिकांनी फलाटावरच दिला प्रसाद

First published: March 23, 2019, 3:15 PM IST

ताज्या बातम्या