टीव्हीसृष्टीला आणखी एक धक्का, 'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्रीचं निधन

टीव्हीसृष्टीला आणखी एक धक्का, 'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्रीचं निधन

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता श्रीवास्तव (Sangeeta Srivastav) यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता श्रीवास्तव (Sangeeta Srivastav) यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस प्यार को क्या नाम दूं' (Iss Pyar Ko Kya Naam Doon) तसंच 'थपकी प्यार की' (Thapki Pyar Ki...) या मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. दीर्घकाळापासून संगीता वॅसक्यूलिटीस (vasculitis)या आजाराने त्रस्त होत्या. या आजाराच्या उपचारासाठी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

2011 मध्ये सुरू झालेल्या 'इस प्यार को क्या नाम दूं' या मालिकेमध्ये त्यांनी काम केले होते आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती. दीर्घकाळापासून त्या या आजाराशी लढत होत्या. कोलिलाबेन रुग्णालयामध्ये संगीता यांनी अखेरचा श्वास घेतला.

(हे वाचा-SSR Case: 'चहामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला...', रियाचे 6 चॅट समोर आल्याने खळबळ)

2020 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक वर्ष राहिलं आहे. 5 ऑगस्ट 2020  या दिवशी 'इस प्यार को क्या नाम दूं' या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत समीर शर्मा या अभिनेत्यान त्याच्या मालाड येथील घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे गुढ देखील अद्याप उलगडले नाही आहे.

(हे वाचा-SSR Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या हस्तक्षेपामुळे रियाच्या अडचणी वाढणार?)

टेलिव्हिजन सृष्टीप्रमाणेच बॉलिवूडने देखील अनेक कलाकार यावर्षी गमावले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तर मनोरंजन विश्वातील वातावरण संपूर्ण ढवळून निघाले आहे. अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर यांनी देखील यावर्षी संपूर्ण जगाला अलविदा केले. मराठमोळा दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत याचं अकाली जाणं देखील मनाला चटका लावणारं होतं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 26, 2020, 3:19 PM IST
Tags: tv actress

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading