माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, शो मेकर्सनी बिग बॉस 15 ची तयारी सुरु केली आहे. यावेळी बिग बॉस कलाकारांसोबत सर्वसामन्य लोकांचाही समावेश असणार आहे. बिग बॉस 14 च्या अंतिम सोहळ्यातचं अभिनेता आणि होस्ट सलमान खानने याबद्दलची घोषणा केली होती. आता बिग बॉस 15 बद्दल अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. शो मेकर्सनी बिग बॉस 15 मध्ये सहभाग घेण्यासाठी अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आणि रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अप्रोच केलं असल्याचं म्हटलं जात आहे.View this post on Instagram
समोर आलेल्या माहितीनुसार मेकर्सनी बिग बॉस 15 साठी रिया चक्रवर्तीसोबत संवाद साधला आहे. जर तिच्याकडून शोमध्ये सहभागी होण्यासाठी होकार मिळाला तर मेकर्स अंकितालासुद्धा शोमध्ये येण्यासाठी अप्रोच करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स देत आहेत. (हे वाचा:अंकिता लोखंडेने घरी ठेवली खास पूजा; वाचा काय आहे यामागचं कारण ) अंकिता आणि रिया या दोन्ही अभिनेत्रीं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्या आहेत. त्यामुळे त्याच्या निधनानंतर दोघीही खुपचं चर्चेत आल्या होत्या. सुशांतच्या चाहत्यांनी दोघींवरही अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. काहींनी अंकिताचं सुशांतसाठी योग्य असल्याचं सांगत रियाला ट्रोलदेखील केल होतं. तसेच रिया चक्रवर्तीला या प्रकरणात संशय केला जात होता. इतकचं नव्हे तर यामधून पुढे आलेल्या ड्रग्स कनेक्शन मधून तिला अटकसुद्धा करण्यात आली होती. बिग बॉसची माहिती समोर येताच या दोघींच्या सहभागानंतर शोमध्ये सुशांतच्या प्रकरणावरून वाद रंगणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ankita lokhande, Bigg boss, Rhea chakraborty