Home /News /entertainment /

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस नांबियारचे Honeymoon फोटो VIRAL, मौनी रॉयच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस नांबियारचे Honeymoon फोटो VIRAL, मौनी रॉयच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

Mouni Roy

Mouni Roy

नागिन फेम टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. 27 जानेवारी 2022 रोजी गोव्यात मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, त्यांच्या हनीमूनचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी: नागिन फेम टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. 27 जानेवारी 2022 रोजी गोव्यात मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या फोटोंमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या मौनीच्या चाहत्यांनी ती हनीमूनला कुठे जाणार याची उत्सुकता लागली आहे. अशातच काही फोटो शेअर करत तिने आपला हनीमून काश्मीरमध्ये सेलिब्रेट करत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर सध्या मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस नांबियार यांचे हनीमूनचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. पती सुरजसोबत रोमँटिक पोज देत मौनीने काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. presently SunMoon-ing!!!!!! अशी तिने खास कॅप्शन दिली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by mon (@imouniroy)

  मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस नांबियार दोघे आपला हनीमून काश्मीरमध्ये सेलिब्रेट करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिने काही फोटोमध्ये ती हनीमून दरम्यान पुस्तक वाचताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by mon (@imouniroy)

  तिच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. काहींनी रेड हार्ट इमोजी शेअर करत मौनीबद्दल असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. काहीदिवसांपूर्वी, लग्नानंतर पहिल्यांदा मुंबई विमानतळावर दोघे स्पॉट झाले होते. यावेळी मौनी रॉयने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. या पारंपारिक लूकमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत होती.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या