देवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL

देवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या थरारक मालिकेने चाहत्यांना अगदी खिळवून ठेवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून- ‘देवमाणूस’ (Devmanus)  ही मालिका जितकी लोकप्रिय झाली आहे, तितकेच मालिकेतील कलाकारसुद्धा. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालीकेतील डिंपलचेसुद्धा (Dimple) बरेच चाहते आहेत. तर नव्याने एन्ट्री घेतलेल्या महिला वकील आर्यानेसुद्धा (Aarya) लोकांची पसंती मिळवली आहे. हे कलाकार मालिकेत जितके गंभीर असतात. तितकीच मजामस्ती ते सेटवर करत असतात. डिंपल आणि आर्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतं आहे. यामध्ये त्या दोघी प्रियंका चोप्राच्या देसी गर्ल गाण्यावर धम्माल डान्स करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Asmeeta Deshmukh (@asmeetadeshmukh_7official)

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या थरारक मालिकेने चाहत्यांना अगदी खिळवून ठेवलं आहे. मालिकेत दररोज नवनवे ट्वीस्ट येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा ही मजेशीर आहे. टोण्या पासून आजीपर्यंत सर्वच कलाकार अगदी लोकप्रिय झाले आहेत. या सर्व कलाकारांमध्ये खुपचं चांगलं बॉन्डीगसुद्धा आहे. हे लोक ऑफस्क्रीन खुपचं धम्माल करत असतात.

(हे वाचा:'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं  )

शुटींगमधून वेळ मिळाल्यानंतर हे कलाकार धम्माल करत असतात. वेगवेगळ्या गाण्यावर जबरदस्त डान्स करतानासुद्धा दिसून येतात. अनेकवेळा ACP दिव्या, डिंपल, आर्या किंवा संपूर्ण टीमचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. नुकताच डिंपल आणि आर्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघीही ‘देसी गर्ल’ या प्रियांकाच्या गानायावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. तसेच या व्हिडीओवर विविध मजेशीर कमेंटसुद्धा येत आहेत.

(हे वाचा:पाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL  )

‘देवमाणूस’ ही मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिकेत अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. आत्ता ACP दिव्या डॉक्टरचं सत्य सर्वांसमोर सिद्ध करण्यात यशस्वी होणार का? आणि डॉक्टर फासावर लटकणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Aiman Desai
First published: June 22, 2021, 2:59 PM IST

ताज्या बातम्या