करण जोहरकडे स्वयंपाक करायची आई, केबीसीच्या हाॅट सीटवर महाराष्ट्राचे दीपक भोंडेकर

करण जोहरकडे स्वयंपाक करायची आई, केबीसीच्या हाॅट सीटवर महाराष्ट्राचे दीपक भोंडेकर

दीपक भोंडेकर एका कनिष्ठ मध्यमवर्गीय परिवारातून आलेत. दीपकची कहाणी पाहिल्यावर प्रेक्षक एकदम इमोशनल झाले.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपतीमध्ये हाॅट सीटवर बसलेली अनुराधा मंगल नवव्या प्रश्नानंतर बाहेर पडली. मंगल बिग बींना पाहून इतकी भारावून गेली की प्रश्नांची उत्तरंच विसरली. 80 हजाराव्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिल्यानं तिच्या वाट्याला 10 हजार रुपयेच आले.त्यानंतर संधी मिळाली ती महाराष्ट्राच्या दीपक भोंदेकरना.

दीपक भोंडेकर एका कनिष्ठ मध्यमवर्गीय परिवारातून आलेत. दीपकची कहाणी पाहिल्यावर प्रेक्षक एकदम इमोशनल झाले. दीपकचे वडील घर चालवण्यासाठी आॅटो रिक्क्षा चालवायचे. त्यांना हातभार लावण्यासाठी आई पापड तयार करून विकायची.

मकरंद अनासपुरे घेऊन येतोय इरसाल नमुने!

'नकळत सारे घडले'मध्ये नेहाला सोडावं लागतंय घर कारण ....

विक्रांत सरंजामे-ईशामधलं प्रेम वयातल्या अंतरापेक्षा महत्त्वाचं, म्हणतायत प्रेक्षक

दीपक यांनी शिक्षणाबरोबर आपल्या आई-वडिलांना मदत केलीय. त्यांचं शिक्षण कठीण परिस्थितीत पार पडलं खरं, पण त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.

दीपकच्या आईन सगळ्यांसमोर दीपकची एक खासीयत सांगितली. दीपक दिवसभरात अभ्यास करून 27 किलो पापड बनवायचे. शिवाय दीपकची आई करण जोहरच्या घरी स्वयंपाक करायची. त्यावेळी दीपक यांनी लता मंगेशकर, शाहरूख खान यांना जवळून पाहिलंय.

दीपक केबीसी खूप आत्मविश्वासानं खेळतायत. आतापर्यंत ते 12 लाख 50 हजार रुपये जिंकलेत. आज ते 25 लाखाच्या प्रश्नासाठी खेळणार आहेत. ते किती कमावतायत, करोडपती होतायत की नाही, ते आज कळेल.

First published: September 18, 2018, 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading