'प्रायव्हेट पार्ट'चे फोटो पाठवायचा हा विकृत माणूस, अभिनेत्रीची मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

'प्रायव्हेट पार्ट'चे फोटो पाठवायचा हा विकृत माणूस, अभिनेत्रीची मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

टीव्ही शो 'FIR' ची 'चंद्रमुखी चौटाला' अर्थात अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) ने तक्रार करत राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना देखील टॅग केले आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर: टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने (Kavita Kaushik) एका इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सायबर क्राईम अंतर्गत अभिनेत्रीने तक्रार दाखल केली असून सोशल मीडियावर ती व्यक्ती अश्लील हरकत करत असल्याची तक्रार तिने केली आहे. त्यामुळे कंटाळून अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. तिने असा आरोप केला आहे की, तो माणूस सातत्याने तिला सोशल मीडिया (Social Media) वर त्याचे अश्लील फोटो पाठवत असे. आरोपीला लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी कविताने केली आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून तिचा राग व्यक्त केला आहे.

संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईलचा फोटो शेअर करत तिने त्याला जगासमोर आणले आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने असे म्हटले आहे की, 'शंकर' नावाची ही व्यक्ती त्याच्या प्राइव्हेट पार्ट्सचे फोटो सेलिब्रिटींना पाठवत आहे. विचार करा कमी प्रिव्हिलेज असणाऱ्या मुलींना त्याच्यापासून किती धोका आहे. कुणाला यामुळे वाईट कसे नाही वाटले आणि तो कुठे राहतो हे शोधून त्याच्या घराबाहेर नारे लावावेसे नाही का वाटले? सर्व जोर महिलांवरच चालतो का?'

अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) ने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यात तिने राष्ट्रीय महिला आयोग, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केले आहे. कवितांच्या या तक्रारीबाबत लवकरच कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांकडून दिली जात आहे.

सध्या कविता 'बिग बॉस' सीझन 14 मध्ये स्पर्धक बनेल अशा चर्चा आहेत. काही मीडिया अहवालानुसार ती शो मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊ शकते. कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून अद्याप याबाबत निर्मात्यांकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही आहे. कविता नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध सामाजिक मुद्द्यावर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 22, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या