मुंबई, 27 नोव्हेंबर : पूर्वी बिग बाॅसच्या घरात राहिलेली आणि काँट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत नुकतीच वुटच्या बिग बाॅस बझमध्ये आली होती. यावेळी राखीनं तिच्या नेहमीच्या स्टाइलनं बरीच चमत्कारिक विधानं केली. तिनं फक्त बिग बाॅसमधल्या स्पर्धकांबद्दल सांगितलं नाही तर तिचा मागचा अनुभव शेअर केला.
ती म्हणाला, 'मी बिग बाॅसमध्ये आले होते तेव्हा बिग बाॅस व्हर्जिन होते. मी त्यांची मग पत्नी झाले.'
राखीला जेव्हा विचारलं की तुझा आवडता स्पर्धक कोण ? तेव्हा तिनं श्रीशांतचं नाव घेतलं. ती म्हणाली, श्रीशांतला घरात जास्त अॅक्टिव्ह राहायला हवं. तो सारखा म्हणतो की मला बाहेर जायचंय, बाहेर जायचंय...मग जा ना, कोण थांबवतंय?
या शोचे होस्ट अपारशक्ती खुरानानं राखीला विचारलं, तू जसलीन, श्रीशांत, करवीन आणि दीपिका यांना काय दान करायला सांगशील? यावर राखीचं उत्तर मार्मिक होतं. ती म्हणाली, जसलीननं तर अनुपजींना दान करावं. अनुपजींना मी घेईन. मला त्यांच्याबरोबर शाॅवर घ्यायला आवडेल.
श्रीशांतनं त्याचा राग दान करावा, तर करवीननं तिचे केस आणि दीपिकानं अश्रू अशी उत्तरं राखीनं दिली. आपल्या चमत्कारिक बोलण्यानं आणि वागण्यानं राखी नेहमीच चर्चेत राहते.
काही दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना जखमी झालेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. रेबल या विदेशी कुस्तीपटूने राखी सावंतला कुस्तीमध्ये उचलून आपटलं होतं. यामध्ये राखीला गंभीर दुखापत झाली होती. तसंच तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. 'मी आता पूर्णपणे बरी झाली असून पुन्हा एकदा विदेशी कुस्तीपटू रेबल हिला आव्हान देणार आहे', असं राखी आता म्हणते आहे.
लग्नाआधी नववधूसारखं सजलं प्रियांका चोप्राचं घर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा