मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'पवित्र रिश्ता 2' मुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे; सुशांतच्या चाहत्यांनी केली बायकॉटची मागणी

'पवित्र रिश्ता 2' मुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे; सुशांतच्या चाहत्यांनी केली बायकॉटची मागणी

12 वर्षांपूर्वी आलेल्या ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीला खुपचं पसंत केलं जातं.

12 वर्षांपूर्वी आलेल्या ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीला खुपचं पसंत केलं जातं.

12 वर्षांपूर्वी आलेल्या ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीला खुपचं पसंत केलं जातं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 जुलै- छोटा पडद्यापासून (Tv) बॉलिवूड (Bollywood) पर्यंत आपली ओळख बनवलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2) च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली आहे. याच मालिकेने अंकिता (Ankita Lokhande) आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला (Sushant Singh Rajput) घराघरात पोहोचवलं होतं. मात्र पवित्र रिश्ता 2 आल्यामुळे सुशांतचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की सुशांतची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि म्हणूनचं सुशांतच्या चाहत्यांनी अंकिता लोखंडेलासुद्धा धारेवर धरलं आहे.

12 वर्षांपूर्वी आलेल्या ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीला खुपचं पसंत केलं जातं. होतं अर्चना आणि मानव म्हणजेच सुशांत आणि अंकिता रील ते रियल लाईफ कपल बनले होते. त्यांची रील आणि रियल जोडी चाहत्यांना खुपचं पसंत पडली होती. आत्ता पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता’ चाहत्यांसाठी परतल आहे. यामध्ये अर्चना अभिनेत्री अंकिता लोखंडेचं साकारत आहे. तर मानवच्या भूमिकेसाठी अभिनेता शाहीर शेखला घेण्यात आलं आहे. याआधी ही भूमिका अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारली होती. तर त्यांनतर अभिनेता हितेन तेजवानीने साकारली होती. मात्र सुशांत सिंह राजपूत प्रचंड लोकप्रिय झाला होता.

नुकताच अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर क्लिपबोर्डसोबत एक व्हिडीओ शेयर केला होता. हा व्हिडीओ पाहताच सुशांतचे चाहते तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करू लागले आहे. सुशांतची जागा दुसरा कोणीच घेऊ शकत नाही, असं म्हणत चाहते नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

(हे वाचा:संजय नार्वेकरांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘या’ मालिकेतून घेणार दमदार एण्ट्री  )

यावेळी चाहते ‘पवित्र रिश्ता 2’ ला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. शिवाय #Baycottpavitrarishta 2 असा याचा वापर करून सोशल मीडियावरून या मालिकेला विरोध दर्शवण्यात येत आहे. एका युजरने कमेंट् करत म्हटलं आहे, सुशांतची जागा कोणी नाही घेऊ शकत, तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे ‘तुझा हा शो पूर्णपणे फ्लॉप होईल अंकिता लोखंडे, तर आणखी एकाने म्हटलं आहे, ‘सुशांत नाही तर पवित्र रिश्ता 2 नाही’. अशा अनेक प्रतिक्रया देवून चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Ankita lokhande, Sushant sing rajput, Tv actors, TV serials