Home /News /entertainment /

कपिलच्या शोमध्ये सुमोना झळकणार नव्या रुपात; अर्चनाचा मोठा खुलासा

कपिलच्या शोमध्ये सुमोना झळकणार नव्या रुपात; अर्चनाचा मोठा खुलासा

पुन्हा एकदा The Kapil Sharma Show आपल्याला हसवून लोटपोट करण्यासाठी सज्ज आहे.

  मुंबई, 13 ऑगस्ट- ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मधून सुमोना चक्रवर्तीला (Sumona Chakrborty) बाहेर केल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगली होती. त्यामुळे चाहतेदेखील नाराज झाले होते. तसेच सुमोनाला परत आणण्याची मागणी करत होते. यासर्वांसाठी एक आनंदाची माहिती आहे. सुमोना या शोमध्ये झळकणार असल्याची माहिती शोची जज अर्चना पूरन सिंगने (Archana Puran Singh) दिली आहे.
  टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोमधील एक म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ला ओळखलं जातं. चाहते या शोला भरभरून दाद देतात. मात्र काही महिन्यांपासून या शो ने छोट्या पडद्यावरून विश्रांती घेतली होती. मात्र आत्ता पुन्हा एकदा हा शो आपल्याला हसवून लोटपोट करण्यासाठी सज्ज आहे. (हे वाचा: ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte;‘त्या’ न्यूड सीनमुळे होतेय ट्रोल;) दर्शकांना या शो ची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. कपिलने नव्या सेटवरील  काही फोटो चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. यामध्ये काही नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. तर काही जुने कलाकार गायब आहेत. तसेच या शोमध्ये कपिलच्या पत्नीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्तीसुद्धा प्रोमोमधून गायब होती. त्यामुळे ती या शोमध्ये दिसणार नसल्याची चर्चा सुरु आहे. मात्र सर्वांसाठीचं एक आनंदाची माहिती आहे. सुमोना चक्रवर्ती या शोमध्ये आपल्यला हसवताना दिसून येणार आहे. शोची जज अर्चना पूरन सिंगने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. (हे वाचा: अभिषेकने विकलं आपलं लग्जरी घर; तब्बल इतक्या कोटींमध्ये केलं होतं खरेदी) आज तकच्या रिपोर्टनुसार, अर्चना यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे, की ‘सुमोना या सिझनमध्ये एका नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. यावेळी तिची भूमिका एकदम वेगळी असणार आहे. यामध्ये ती ‘भुरी’चं पात्र साकारताना दिसणार नाहीय’. यावेळी कपिलचं कुटुंब खूपच मोठं होताना दिसत आहे. नव्या सिझनमध्ये कपिलचा जुना साथी सुदेश लहरीचीसुद्धा एन्ट्री झाली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, The kapil sharma show

  पुढील बातम्या