• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: देवीसिंगला आहे जुळा भाऊ? 'देवमाणूस' मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

VIDEO: देवीसिंगला आहे जुळा भाऊ? 'देवमाणूस' मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 जुलै- ‘देवमाणूस’ (Devmanus)  मालिकेने दर्शकांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. मालिकेने सर्वांचीचं उत्कंठा वाढवून ठेवली आहे. मालिकेत सध्या नवनवीन ट्वीस्ट येत आहेत. देवीसिंग(Devisingh) उर्फ डॉ. अजितकुमार देवने(Dr. Ajit kumar Dev) आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याला ACP दिव्याने कोर्टात उभ केलं आहे. मात्र आपल्या धूर्तपणाने डॉक्टर केसला दररोज एक नवं वळण देत आहे. सध्या मालिकेत असाच एक नवा ट्वीस्ट येणार आहे. पाहूया काय आहे हा ट्वीस्ट...
  View this post on Instagram

  A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

  झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेच्या रहस्यमयी आणि थरारक कथानकाने दर्शकांवर गारुड घातलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक भागासाठी चाहते उत्सुक असतात. शिवाय सध्या मालिकेत खुपचं उत्कंठा वाढवणारं वळण आलं आहे. आजपर्यंत डॉक्टर म्हणजेच देवीसिंगने केलेल्या खुनांचा छडा लावण्यासाठी त्याला ACP दिव्याने कोर्टात उभ केलं आहे. मात्र सर्व पुरावे सादर करूनही केवळ आणि केवळ आपल्या धूर्त बुद्धीने डॉक्टर त्यातून पळवाट शोधून काढतोच. त्यामुळे सरकारी वकील आर्या आणि दिव्या सिंगसुद्धा त्रस्त झाले आहेत. अशातच मालिकेत एक नवा ट्वीस्ट येणार आहे. (हे वाचा: अभिनेत्रीने चक्क दारू पीत PHOTO केले शेयर; BOLD लुकची होतेय चर्चा) नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे, की देवीसिंगला सख्खा जुळा भाऊसुद्धा असतो. आणि त्याचच नाव डॉ. अजितकुमार देव असं असतं. मात्र आपल्या पैशांच्या लोभापायी देवीसिंगने त्याची सुद्धा गळा दाबून हत्या केलेली असते. या प्रोमोने सर्वांनाचं बुचकळ्यात टाकलं आहे. आत्ता खरच देवीसिंगला कोणी जुळा भाऊ होता? की हेसुद्धा त्याच्या धूर्त बुद्धीचं नवं नाटक आहे, हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: