• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • बापरे! ही शिल्पा शेट्टी? भीतीदायक VIDEO पाहून चाहते पडले बुचकळ्यात

बापरे! ही शिल्पा शेट्टी? भीतीदायक VIDEO पाहून चाहते पडले बुचकळ्यात

नुकताच सोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सुपर डान्स 4’ चा प्रोमो रिलीज केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर दिसून येत आहे. टीव्ही शो ‘सुपर डान्सर 4’ मध्ये (Super Dancer 4) ती परीक्षकाची भूमिका साकारत आहे. मात्र यावेळी सेटवर ती एक खुपचं भयानक प्रॅन्क करताना दिसून येणार आहे. ती वैभवसाठी भुताच्या रुपात अवतरणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून वैभवने तिला जितकी भीती घातली आहे. त्या सर्वांचा तिला एका झटक्यात हिशोब चुकता करायचा आहे. म्हणूनचं तिने हे रूप धारण केलं आहे.
  नुकताच सोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सुपर डान्स 4’ चा प्रोमो रिलीज केला आहे. त्यामध्ये शिल्पा शेट्टी एका भयानक रुपात दिसून येत आहे. तिचा हा मेकअप पाहून भल्या भल्यांना घाम फुटला आहे. या प्रोमोमध्ये शिल्पा शेट्टी भुत होण्यासाठी मेकअप करत असते. आणि त्यावेळी ती मेकअपमनला म्हणते, वैभवने गेल्या 3 वर्षात मला खूप घाबरवलं आहे. आत्ता मी त्याचा असा बदला घेणार. आणि नंतर आरशात पाहून स्वतःलाच घाबरते, इतका हा मेकअप भयानक वाटतं आहे. सध्या शिल्पाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. (हे वाचा:'या' सुंदर अभिनेत्रीनीं केलं आहे 'क्राईम शो' होस्ट; पाहा PHOTO) अभिनेत्री शिल्पा शेट्टी लवकरच बहुप्रतीक्षित ‘हंगामा 2’ या चित्रपटात झळकणार आहे. आजचा या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा रिलीज झाला आहे. ‘हंगामा 2’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हंगामा प्रमाणेच हंगामा 2 मध्येसुद्धा अभिनेता परेश रावल सगळ्यांना पोट धरून हसायला लावणार आहेत. हंगामा 2 मध्ये शिल्पा शेट्टी आणि परेश रावलसोबत राजपाल यादव, मिजान जाफरी, प्रणिता अशी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: