Home /News /entertainment /

Drug Case मध्ये जामीन मिळाल्यानंतर सेटवर पोहोचली भारती सिंह, या प्रकरणानंतर पहिल्यांदा शेअर केली ही पोस्ट

Drug Case मध्ये जामीन मिळाल्यानंतर सेटवर पोहोचली भारती सिंह, या प्रकरणानंतर पहिल्यांदा शेअर केली ही पोस्ट

ड्रग्ज प्रकरणात (Drug Case) अटक आणि त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंहने (Bharti Singh) सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

    मुंबई, 28 नोव्हेंबर: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) यांच्या  घरी काही दिवसांपूर्वी एनसीबीने छापेमारी केली होती. याठिकाणाहून गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  (Narcotics Control Bureau) कॉमेडियन आणि तिचा नवरा दोघांनाही अटक केली होती. दरम्यान आता भारती सिंह आणि हर्ष दोघांनाही ड्रग प्रकरणात जामीन दिला आहे. मात्र एनसीबीकडून या प्रकरणात चौकशी अद्यापही सुरू आहे. अलीकडेच एनसीबीने त्या ड्रग पेडलरलाही अटक केली आहे जो भारती आणि हर्षला ड्रग पुरवत असे. दरम्यान अटक आणि त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर भारती सिंहने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. भारती सिंह जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शूटिंग सेटवर परतली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने शूटिंगला पुन्हा सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. भारतीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही माहिती दिली आहे. यामध्ये ती 'बाहुबली'मधील शिवगामी देवीच्या भूमिकेत दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना भारतीने #funhitmeinjaari असा हॅशटॅगही वापरला आहे. (हे वाचा-आमिर खान अभिनय सोडून करणार हे काम, SS राजामौलींसाठी सांभाळणार मोठी जबाबदारी) या फोटोमध्ये भारतीबरोबर कृष्णा अभिषेक देखील दिसत आहे, जो कटप्पाच्या वेशात  दिसत आहे तर मुबीन सौदागर देखील आहे. एनसीबीने अटक केल्यांनतर आणि ड्रग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर भारतीने पहिल्यांदाच सोशल मीडियावर काही शेअर केलं आहे. बेल मिळाल्यानंतर तिने सर्वात आधी गणपतीचे स्मरण केले होते, तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बाप्पाचा फोटो आणि आरती देखील शेअर केली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood, Television, मनोरंजन

    पुढील बातम्या