'या' टीव्ही कपलमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा, 3 वर्षांपूर्वी केलं होतं कोर्ट मॅरेज

टीव्हीच्या या फेमस कपलंनं सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.

  • Share this:

टीव्ही कपल सिद्धांत कर्णिक आणि मेघा गुप्ता यांच्या वैवाहिक जीवनात सध्या बरेच वाद असल्याचं बोललं जात आहे. 2016मध्ये या दोघांनीही लग्न केलं होतं. पण आता लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांनंतर या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

टीव्हीवरील या फेमस कपलनं डिसेंबर 2018 नंतर एकमेकांसोबत कोणताही फोटो शेअर केलेला नाही. या दोघांचेही इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यास दोघंही नेहमीच एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करताना दिसतात. यामुळेच या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं नुकतंच या विषयावर सिद्धांतशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र यावर 'असं काहीही नाही' असं सांगत सिद्धांतन या विषयावर बोलणं टाळलं. तर मेघानंही माझ्याकडे या विषयावर बोलण्यासारखं काहीही नाही असं सांगितलं.

2016 मध्ये या फेमस टीव्ही कपलनं कोर्ट मॅरेज केलं होतं. कार्तिक सोबत मेघाचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिनं 'शादी फेम'चा मालक आदित्य श्रॉफ सोबत लग्न केलं होतं पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. याशिवाय मेघानं टीव्ही अभिनेता नमन शॉला डेट केलं आहे.

मेघा गुप्ता टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध कलाकार आहे. मेघानं काव्यांजली, कुमकुम, सीआयडी, मैं तेरी परछाई हूं, ड्रीम गर्ल आणि यहा मै घर घर खेली या मालिकांमध्ये काम केलं आहे.

सिद्धांत कर्णिकनं एक था राजा एक थी राणी या मालिकेत शेवटचं काम केलं यानंतर तो टीव्ही पासून दूर आहे. त्याआधी त्यानं वे रिमिक्स, माही वे, रिश्ता डॉट कॉम, प्यार की ये एक कहानी, गुस्ताख दिल आणि ये है आशिकी या मालिकांमध्ये काम केलं आहे.

आता मेघा आणि सिद्धांतचं लग्न तुटल्याची चर्चा कितपत खरी आहे हे माहित नाही पण त्यांच्या वेगळं होण्यानं त्यांचे चाहते मात्र नाराज होणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या