टीव्हीवरील छोटीशी 'गंगूबाई' झाली 17 वर्षांची, नव्या लुकमध्ये ओळखणं झालं कठीण

आपल्या कॉमेडीनं लोकांना वेड लावणारी सलोनी आता सोशल मीडिया क्वीन बनली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 02:41 PM IST

टीव्हीवरील छोटीशी 'गंगूबाई' झाली  17 वर्षांची, नव्या लुकमध्ये ओळखणं झालं कठीण

टीव्हीवर दरवर्षी अनेक चेहरे येतात. काही हिट होतात तर काही ठराविक काळानंतर अचानक गायब होऊन जातात. पण काही असतात जे कालांतरानं एका नव्या अंदाजात पुन्हा एकदा आपल्यासमोर येतात. टीव्हीवरील अशीच एक बालकलाकार जी आता पूर्णपणे वेगळी दिसते. टीव्ही वरील छोटीशी पण दमदार गंगूबाई सर्वाच्याच लक्षात असेल. ज्या मुलीनं आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून सर्वांना खळखळून हसवलं होतं. ही तीन वर्षाची मुलगी फार थोड्या काळातच छोट्या पडद्यावर सुपरस्टार बनली होती.

टीव्हीवरील ही छोटीशी गंगूबाई म्हणजे कॉमेडियन सलोनी डॅनी. सलोनीनं वयाच्या तिसऱ्या वर्षीच टीव्हीवर डेब्यू केला होता आणि पदार्पणातच ती गंगूबाई या नावाने प्रसिद्धही झाली होती. या तीन वर्षाच्या मुलीनं त्यावेळी अनेक प्रसिद्ध कॉमेडीयन्सना टक्कर दिली होती.

सलोनीनं 'कॉमेडी सर्कस महासंग्राम'मधून कॉमेडियन म्हणून डेब्यू केला होता आणि या शोनंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. काही काळातच ती अनेक प्रसिद्ध कॉमेडियनसोबत वेगवेगळे शो करताना दिसली. लहानग्या सलोनीच्या या टॅलेंटनं लोकांना आश्चर्य वाटायचं.

Loading...

हीच सलोनी आता 17 वर्षांची झाली आहे. ती आता एवढी स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणंही प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना कठीण होऊन बसलं आहे. आपल्या कॉमेडीनं लोकांना वेड लावणारी सलोनी आता सोशल मीडिया क्वीन बनली आहे.

'कॉमेडी सर्कस महासंग्राम'मधून प्रसिद्धी मिळवणारी सलोनी 'इक्का-दुक्का' या मालिकेतही दिसली. मात्र या मालिकेत तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. 'बड़े भइया की दुल्हनिया' ही तिनं केलेली शेवटची मालिका, त्यानंतर ती टीव्हीवरून गायब झाली. सलोनी 2010मध्ये 'नो प्रोब्लेम' या सिनेमात पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...