सलमान खाननं केलं लग्न, वधूच्या भांगात सिंदूर भरतानाचा VIDEO VIRAL

सलमान खाननं केलं लग्न, वधूच्या भांगात सिंदूर भरतानाचा VIDEO VIRAL

सलमान खान लग्न कधी करणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. पण नुकताच सलमानच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या सिनेमाच्या प्रमोशन आणि बिग बॉस 13 च्या होस्टिंगमध्ये बीझी आहे. सलमान त्याच्या प्रोफेशनल लाइफमध्ये इतका बीझी आहे की त्याला त्याच्या पर्सनल लाइफसाठी फार कमी वेळ मिळतो. अशातच अनेकजण त्याला वेळोवेळी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारत असतो. तर नुकताच सलमानच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो वधूच्या भांगात सिंदूर भरताना सुद्धा दिसत आहे.

सलमान खानचं लग्न ही बिग बॉसच्या आगामी एपिसोडची एक झलक आहे. ‘वीकेंड का वार’ यावेळी सलमान खानसोबत कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर सुद्धा मस्ती करताना दिसणार आहे. या शोमध्ये सुनील पुन्हा एकदा त्याच्या गुत्थीवाल्या अवतारात दिसणार आहे. कलर्स टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर सलमान आणि गुत्थीच्या लग्नाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सलमान आणि गुत्थी लग्न करताना दिसत आहेत.

Evergreen : भारतातले टॉप 5 पाकिस्तानी कलाकर, बॉलिवूडमध्ये घडवलाय इतिहास

या व्हिडीओमध्ये सलमान आणि गुत्थीचा रोमान्स त्यानंतर त्यांचं लग्न, हानीमून इतकंच नाही तर या दोघांचं एक बाळ सुद्धा दाखण्यात आलं आहे. तसेच सलमान ब्रशनं गुत्थीच्या भांगात सिंदूर भरताना दिसत आहे आणि बॅकग्राउंडला सलमान खानचा सिनेमा ‘भारत’मधील रोमँटिक साँग ‘दिल दिया गल्ला’ वाजत आहे. या संपूर्ण व्हिडीओमध्ये सलमान पोट धरुन हसताना दिसत आहे. तर गुत्थी पूर्णपणे रोमँटिक मूडमध्ये आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की 14 डिसेंबर म्हणजेच आज प्रसारित होणारा बिग बॉसचा एपिसोड खूपच एंटरटेनिंग होणार आहे.

जयंती विशेष : दिग्दर्शकाची एक थप्पड आणि बदललं राज कपूर यांचं आयुष्य!

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं त्याची आणि सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेला ‘दबंग 3’ येत्या 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभूदेवानं केलं असून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

फिटनेससाठी रोज सूर्योदयाआधी उठतो बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार

Published by: Megha Jethe
First published: December 14, 2019, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading