मुंबई, 15 जून- एखाद्या टीव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करत असतात. सर्वात प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भाभी जी घर पर है' मधील अंगुरी भाभी अर्थात शुभांगी अत्रेने तिचा बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेहमी मालिकेत साडीमध्ये दिसणारी अंगूरी भाभी यात ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या फोटोचं काही जण कौतुक करत आहेत तर काहींनी निरर्थक कमेंटही केल्या आहेत.
शुभांगीने पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलं होतं आणि त्यासोबत तिने काळ्या रंगाची हॉट पॅन्ट घातली होती. या फोटोत शुभांगी खूप सुंदर दिसत होती. या फोटोतील तिच्या सौंदर्याचं अनेकांनी कौतुकही केलं. मात्र तिच्या शर्टवरून शुभांगीला ट्रोल करण्यात आलं. तिच्या शर्टवर वृत्तपत्राची प्रिन्ट आहे. यावर तू वर्तमानपत्र का घातलं आहे असा प्रश्न तिला विचारला जात आहे. याशिवाय तिच्या हॉट पॅन्टवरही लोकांनी कमेंट केल्या.
हेही वाचा- ...म्हणून शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेचं करायचं होतं अपहरण, स्वतःच सांगितलं कारण
शुभांगीने याआधीही तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हाच हॉट अंदाज प्रेक्षकांनाही आवडतो. तिचे सोशल मीडियावर जितके चाहते आहेत तेवढेच तिला ट्रोल करणारेही आहेत. या सगळ्यात शुभांगी ट्रोल करणाऱ्यांकडे फारसं लक्ष देत नाही. बोल्ड फोटोशूटशिवाय ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवरचा नवरीच्या वेशातला एक लुक शेअर केला होता. हा लुकही प्रेक्षकांना फार आवडला.
हेही वाचा- तैमुरला सोडा, लिसा रेच्या एक वर्षाच्या जुळ्या मुलींचे फोटो पाहिलेत का?
View this post on Instagram
हेही वाचा- ऐश्वर्यापासून नागाचैतन्यपर्यंत, जाणून घ्या 'या' 5 सेलिब्रिटींच्या लग्नातील खर्च
शिल्पा शिंदेनंतर भाभी जी घर पर है या मालिकेत अंगुरू भाभीची भूमिका शुभांगी अत्रेने साकारायला सुरुवात केली. शिल्पाने मालिका सोडल्यानंतर टीआरपीमध्येही घसरण झाली होती. पण शुभांगीच्या येण्याने ही मालिका पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत धावायला लागली.
World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण