जसलीन नंतर आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार अनुप जलोटा?

जसलीन नंतर आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार अनुप जलोटा?

मागच्या सीझनमध्ये गर्लफ्रेंड जसलीन मथारू बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानं अनुप जलोटा खूप चर्चेत होते.

  • Share this:

मुंबई, 14 जून : कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या 12 व्या सीझनमध्ये खळबळ माजवणारे स्पर्धक अनुप जलोटा पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्याची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. ते म्हणाले, मागच्या सीझनमध्ये म्हणजेच बिग बॉस 12 मध्ये मी रिलॅक्स होण्यासाठी आणि सुट्टी एंजॉय करण्यासाठी गेलो होतो आणि आता मी बिग बॉस 13मध्येही जाणार आहे. एकीकडे यंदा कॉमनर्स या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं बोललं जात असताना अनुप जलोटा यंदा सलमान खानसोबत हा शो होस्ट करताना दिसण्याची शक्यता आहे.

आदित्यची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’
 

View this post on Instagram
 

1st day : Anupji's Entry into the #biggboss12 house @biggboss_season.12 @colorstv @jasleenmatharu #jasleenmatharu #biggboss12 #bb12 #karanvirbohra #salmankhan @biggbossfanclub1


A post shared by Anup jalota (@jalotaanup) on

बिग बॉस 12मध्ये अनुप जलोटा गायिका जसलीन मथारूसोबत या शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र यंदाच्या सीझनमध्ये कोणासोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घ्यायची इच्छा आहे असा प्रश्न विचारल्यावर अनुप यांनी अशी इच्छा बोलून दाखवली की, ज्यामुळे ते सलमान खानची नाराजी ओढावून घेऊ शकतात. अभिनेत्री कतरिना कैफसोबत बिग बॉस 13मध्ये सहभागी होण्याची इच्छा अनुप यांनी बोलून दाखवली. दरम्यान ही सर्व वक्तव्य अनुप जलोटा यांनी केली असली तरीही या शोचे निर्माते किंवा कलर्स टीव्ही कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनुप जलोटांच्या ही वक्तव्य कितपत सत्य आहे हे शो सुरू झाल्यावरच समजेलच.

ब्रेकअप होताच सलमानची अभिनेत्री पडली एकटी
 

View this post on Instagram
 

Musical Moments 🎶🎼🎵 @jalotaanup #allaboutlastnight #jasleenmatharu #anupjalota #music


A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

मागच्या सीझनमध्ये गर्लफ्रेंड जसलीन मथारू बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानं अनुप जलोटा खूप चर्चेत होते. पण यावेळी ते नेहमीच टास्क पासून दूर राहताना दिसले होते. त्यामुळे जर ते पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये सहभागी झाले तर प्रेक्षकांचं मनोरंजन कशाप्रकारे करतात हे याची सर्वांना उत्सुकता आहे. बिग बॉस सीझन 12च्या प्रीमियरच्या दिवसापासूनच चर्चेत होते. यावेळी जसलीनला मथारूला आपली गर्लफ्रेंड असल्याचं सांगत त्यांनी घरात खळबळ माजवली होती. पण शोमधून बाहेर पडल्यावर मात्र त्यांनी मी आणि जसलीनमध्ये फक्त गुरू शिष्या एवढंच नातं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

विराटसाठी काहीपण! त्याला भेटता यावं म्हणून अनुष्का करतेय तारेवरची कसरत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या