दया बेन नंतर आता 'ही' एक्‍ट्रेसही प्रेग्नन्सीमुळे घेणार 'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा' मधून Break

दया बेन नंतर आता 'ही' एक्‍ट्रेसही प्रेग्नन्सीमुळे घेणार 'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा' मधून Break

गेल्या 10 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. आणि त्यातल्या बहुतांश कलाकार हे त्याच भूमिकेत आहेत.

  • Share this:

मुंबई 15 नोव्हेंबर :  छोट्या पडद्यावरचा 'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांना खळाळून हसवत आहे. यात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) म्हणजेच दया बेन (Daya Ben) प्रेग्नन्सीमुळे या शो पासून दूर गेलीय. आता दुसरी अभिनेत्री प्रिया आहूजाही (Priya Ahuja)  आई बनणार असून तिनेही या शोमधून तात्पुरती एक्झीट घेतली असं बोललं जातंय. नुकतचं प्रियाने बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. प्रिया आहूजा या शोमध्ये रीटा रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. एका फोटोखाली तिने लिहिलंय की, ती आपल्या पाचव्या मुलाच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे. या फोटोत प्रिया पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसतेय.

या फोटोत ती अतिशय आनंदी दिसत असून 9 व्या महिन्यातल्या दिवसांचा ती आनंद घेत असल्याचं दिसतंय. काही फोटोंमध्ये तिच्यासोबत 'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा'मधले सह कलाकार निधि भानुशाली (Nidhi Bhanushali) आणि कुश शाह (Kush Shah) हेही उपस्थित आहेत.

दिशा काही महिन्यांपासून शो पासून दूर असली तरी तिच्या फॅन्सना तिची उपस्थितीची अजुनही उणीव जाणवत असते. एवढ्या दिवसानंतरही तिची उणीव भासणं हे तिचं यश समजलं जातं. गेल्या 10 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. आणि त्यातल्या बहुतांश कलाकार हे त्याच भूमिकेत आहेत. तरीही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. टीआरपीमध्येही हा शो अगदी वरच्या क्रमांकावर आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2019, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading