Home /News /entertainment /

TV इंडस्ट्रीला मोठा धक्का सुशांत-अंकिताच्या पहिल्या मलिकेतील अभिनेत्रीचं Cardiac arrestने निधन

TV इंडस्ट्रीला मोठा धक्का सुशांत-अंकिताच्या पहिल्या मलिकेतील अभिनेत्रीचं Cardiac arrestने निधन

ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai)' आणि 'कुमकुम भाग्य (Kumkum Bhagya)' या मालिकांमध्ये या अभिनेत्रीने काम केलं होतं.

  मुंबई, 19 ऑक्टोबर : मनोरंजन विश्वाने या वर्षात अनेक तारे आणि तारकांना गमावल्याचं दु:ख आहे. अनेक दिग्गज अभिनेत्यांपासून ते निर्मात्यांपर्यंत अनेक नामवंत कलाकार या वर्षात काळाच्या पडद्याआड गेले. मनोरंजन विश्वातून आणखीन एक वाईट बातमी येत आहे. सुशांत आणि अंकिता लोखंडे यांच्या पहिल्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai)' आणि 'कुमकुम भाग्य (Kumkum Bhagya)' या मालिकांमध्ये या अभिनेत्रीने काम केलं होतं. या अभिनेत्रीने वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कुमकुम भाग्य सिरियलमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री जरीना रोशन खान यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि सिरियलमध्ये कामं केलं होतं. कुमकुम भाग्यात ती इंदू दासीच्या भूमिकेत दिसली होती. जरीना रोशन खान यांना टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
  View this post on Instagram

  💔...

  A post shared by Sriti Jha (@itisriti) on

  View this post on Instagram

  Ye chand sa Roshan Chehera 💔

  A post shared by Shabir Ahluwalia (@shabirahluwalia) on

  श्रीती झाने जरीना रोशन खानसोबत एक फोटोही शेअर केला आहे. ज्याद्वारे त्याने ब्रोकन हार्ट इमोजी तयार केले आहे. यासह त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये जरीना श्रीदेवीच्या गाण्या हवा हवावर नाचताना दिसत आहे. टीव्हीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या अचानक जाण्यानं शोक व्यक्त केला आहे.
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress

  पुढील बातम्या