Home /News /entertainment /

दोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड

दोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड

काही दिवसांपूर्वीच श्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला. कोण आहे ही व्यक्ती...

  मुंबई, 04 जानेवारी : ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं. श्वेतानं 2 लग्न केली मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आलं. तिची दोन्ही लग्न तुटली. पण तरीही ती हारली नाही. तिने तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व समस्यांचा सामना केला. तसेच ती तिच्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहे. दरम्यानं काही दिवसांपूर्वीच श्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे. श्वेताला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सध्या ती कोणाच्या प्रेमात आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना श्वेता म्हणाली, मी सुरुवातीपासूनच माझ्या दोन्ही मुलांच्या (पलक आणि रेयांश) प्रेमात आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसाठी अजिबात वेळ नाही. OMG! छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै, किंमत ऐकून बसेल धक्का
  View this post on Instagram

  Good night selfies #etherealgirl @palaktiwarii

  A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

  श्वेता तिवारी पुढे म्हणाली, माझ्या मुलांवर माझं एवढं प्रेम आहे की मला त्यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणत्याच व्यक्तीची आता गरज वाटत नाही. माझ्या मुलांसोबत मी खूप खूश आहे. रितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातला TikTok VIDEO व्हायरल, एकदा पाहाच!
  View this post on Instagram

  Be.You.tiful❤️ #nanhayatri #bts

  A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

  श्वेता तिवारीनं 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिनं अभिनव कोहलीशी लग्न केलं मात्र तिचं हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकू शकलं नाही. राजा चौधरीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर अभिनवपासून रेयांश नावाचा एक मुलगा आहे. सध्या श्वेता ‘हम तुम और देम’ ही वेब सीरिज आणि ‘मेरे डॅड की दुल्हन’मध्ये काम करत आहे. मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेवर अनुराधा पौडवाल यांची पहिली प्रतिक्रिया
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Tv actress

  पुढील बातम्या