श्वेता तिवारीच्या पतीने घातला राडा; अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO

श्वेता तिवारीच्या पतीने घातला राडा; अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO

छोट्या पडदयावरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ‘खातरों के खिलाडी 11’(Khatron Ke Khiladi 11) मध्ये झळकणार आहे. त्यासाठी ती केपटाऊनला रवाना झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 मे :  छोट्या पडदयावरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari)  ‘खातरों के खिलाडी 11’(Khatron Ke Khiladi 11) मध्ये झळकणार आहे. नुकताच माहिती समोर आली आहे, की या शोचे सर्व स्पर्धक केपटाऊनला (Cape Town)  रवाना झाले आहेत. त्यात श्वेता तिवारीचा सुद्धा समावेश आहे. मात्र शोमध्ये झळकायच्या आधीच श्वेताच्या पतीने मोठा राडा निर्माण केला आहे. श्वेताचा पती म्हणजेच अभिनव कोहली (Abinav Kohali) याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर(Social Media) करत, श्वेतावर अनेक गंभीर उपस्थित केले आहेत. इतकचं नव्हे तर आपल्या मुलासाठी चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साध्याण्याचा इशारा देखील दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024)

श्वेता तिवारीचं केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) जाणं अभिनव कोहलीला अजिबात रूचलेलं नाहीय. अभिनवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पाठोपाठ एक अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. आणि त्यामध्ये आपला मुलगा रेयांशच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

अभिनव कोहलीने आपला पहिला व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे, ‘श्वेता खातरों के खिलाडी मध्ये सहभागी होण्यासाठी काल दक्षिण आफ्रिकेला गेली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं मला फोन करून याबद्दल माझं मत विचारलं होतं. मात्र मी यासाठी नकार दिला होता. तरीसुद्धा ती गेली. मात्र आत्ता माझा मुलगा कुठे आहे?’

अभिनवने आपल्या इन्स्टाग्रामवर तीन व्हिडीओ शेयर केले आहेत, त्यात त्यानं म्हटलं आहे. माझ्या मुलाच्या सुरक्षेसाठी मी चाईल्ड हेल्पलाईनशी सुद्धा संपर्क साधला आहे. मी पोलिसांकडे सुद्धा गेलो होतो. मात्र त्यांनी मला ई मेल करा, चाईल्ड हेल्पलाईनला कळवा असं सांगितलं आहे.

(हे वाचा:BREAKING: कंगना रणौतला कोरोनाची लागण, अभिनेत्री स्वत: दिली माहिती )

तसेच अभिनव पुढे म्हणतो, मी माझ्या मुलाचा फोटो घेऊन कालपासून प्रत्येक हॉटेलमध्ये फिरत आहे. प्रत्येक रिसेप्शनवर जाऊन आपल्या मुलाचा फोटो दाखवून चौकशी करत आहे. मात्र मला अद्यापही काहीचं माहिती मिळालेली नाही. आणि कोणतीच मदत देखील मिळालेली नाही.

(हे वाचा: बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांना मोठा दिलासा, सलमान थेट बँक खात्यात पाठवणार पैसे)

श्वेता तिवारीचं अभिनव कोहली सोबत हे दुसर लग्नं आहे. मात्र या दोघांच्या नात्यात अडचणी आहेत. त्यामुळे ते एकमेकांपासून विभक्त राहतात. आणि मुलगा रियांशच्या कस्टडी साठी केससुद्धा लढत आहेत.

Published by: Aiman Desai
First published: May 8, 2021, 10:50 PM IST

ताज्या बातम्या