अभिनव शुक्लानं क्लिक केला श्वेता तिवारीचा Hot Photo; युजर्स म्हणाले...

अभिनव शुक्लानं क्लिक केला श्वेता तिवारीचा Hot Photo; युजर्स म्हणाले...

श्वेता तिवारी(shweta tiwari) ‘खातरों के खिलाडी 11’ मध्ये सहभागी झाली आहे. त्यानिमित्ताने सध्या ती केपटाऊनमध्ये आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे- छोट्या पडद्यावरील(Tv Actress) अभिनेत्री श्वेता तिवारी(Shweta Tiwari)  सध्या जोरदार चर्चेत आहे. सध्या श्वेताची प्रोफेशन लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्ही चर्चेत आहे. एकीकडे श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली (Abhinav Kohali) यांच्यामध्ये वाद सुरु आहे. हा वाद त्यांच्या मुलाच्या कस्टडी साठी आहे. यामुळे ते सतत एकमेकांविरोधात व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत आहेत. तर दुसरीकडे श्वेता ‘खातरों के खिलाडी 11’ मध्ये सहभागी झाली आहे. त्यानिमित्ताने सध्या ती केपटाऊनमध्ये आहे. आणि तेथील फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेता तिवारीने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये ती खुपचं फिट आणि हॉट दिसत आहे. त्यामुळे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. आणि प्रत्येकजण तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहे. श्वेताने या फोटोसोबत कॅप्शन लिहित म्हटलं अआहे. हा फोटो ‘बिग बॉस 14’ फेम अभिनव शुक्लाने काढला आहे.  श्वेताने अभिनवला फोटो क्रेडीट दिल्यामुळे चाहते खुशसुद्धा आहेत.

अभिनवने याआधीही आपलं फोटोग्राफीचं कौशल्य दाखवलं आहे. श्वेताने सुद्धा फोटोमध्ये खुपचं स्टाईलिश पोझ दिली आहे. यामध्ये श्वेताचे ऍब्ससुद्धा दिसत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतचं अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिचा कौतुक केलं आहे.

(हे वाचा:सोनल चौहान का झाली बॉलिवूडमधून गायब? काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई  )

अभिनेत्री अनिता हसनंदानीने कमेंट करत श्वेताला ‘सुपर हॉट’ असं म्हटलं आहे. तर संगीता बिजलानीने कमेंटमध्ये’सेक्सी’ असं म्हटलं आहे. तर श्वेताने फोटो शेयर करत म्हटलं आहे, ‘ फिटनेस गोल अचिव्ह करण्यासाठी तिची कोणतीही डेडलाईन नाहीय. मी नेहमीचं फिट राहण्यासाठी प्रयत्न करत राहेन.’

(हे वाचा:अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस...पण मागितली सर्वांची माफी  )

दोन मुलांची आई असणारी श्वेता आजही तितकीच फिट आहे. हे बघून अनेकांच्या भुवया उंचावतात. तर अनेकजण तिच्या मेहनतीचं कौतुक देखील करत असतात. आणि तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेमदेखील करत असतात.

Published by: Aiman Desai
First published: May 16, 2021, 4:38 PM IST

ताज्या बातम्या