Home /News /entertainment /

टीव्ही अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; रोलसाठी दिग्दर्शकाने केली होती शय्यासुखाची मागणी

टीव्ही अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; रोलसाठी दिग्दर्शकाने केली होती शय्यासुखाची मागणी

कलाकारांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात. अनेकदा त्यांना कस्टिंग काउचसारख्या समस्येचा देखील सामना करावा लागतो. एका अभिनेत्रीने तिला आलेला भयानक अनुभव शेअर केला आहे.

  मुंबई, 23 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री (TV Actress) डोनल बिष्टने (Donal Bisht) नुकतीच अभिनयातील प्रवासाची 5 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने डोनलने या प्रवासातील काही चांगले, वाईट अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सिनेमा इंडस्ट्रीची (Cinema Industry) झगमगती दुनिया बाहेरून जितकी आकर्षक आणि चांगली वाटते तितकी ती आतून आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. कारण कलाकारांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी येथे खूप कष्ट घ्यावे लागतात. अनेकदा त्यांना कस्टिंग काऊचसारख्या समस्येचा देखील सामना करावा लागतो. ‘दिल तो बच्चा है जी’, ‘रुप मर्द का नया स्वरुप’ आणि ‘लाल इश्क’ आदी टीव्ही मालिकांमधून नावाजलेली अभिनेत्री डोनल बिष्ट (Donal Bisht) हिने नुकतीच या इंडस्ट्रीतील प्रवासाची 5 वर्षं पूर्ण केली. या प्रवासातील एक वाईट अनुभव तिने यावेळी सांगितले. तिने टीव्ही इंडस्ट्रीतील (TV Industry) स्ट्रगलविषयी सांगितलच पण एका दाक्षिणात्य फिल्ममेकरने एका रोलसाठी त्याच्यासोबत झोपण्यास देखील सांगितल्याचं डोनलनं मुंबई मिररशी बोलताना स्पष्ट केले. डोनल बिष्टने (Donal Bisht) आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल केल्याचं यावेळी सांगितलं. ती म्हणाली की, ‘मी जर्नालिझमचे (Journalism) शिक्षण घेतलं आहे. ज्या इन्स्टिटयूटमधून मी हे शिक्षण घेतलं तिथे या कोर्सदरम्यान जास्त फोकस सिनेमा याविषयावर केला जातो. या कोर्समधील माझे सीनिअर मला शॉर्ट फिल्मस, नाटक, म्यूझिक व्हिडीओत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत. मी एक उत्कृष्ट अभिनेत्री होऊ शकते, असा त्यांना विश्वास होता. परंतु, मला पत्रकार व्हायचं होतं.’ ‘एक वेळ अशी होती की एका शोसाठी माझी निवड करण्यात आली. मानधनाची रक्कम ठरली. तारखा देण्यात आल्या आणि एक दिवस अचानक मला त्या शो मधून काढून टाकण्यात आलं अन माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली,’ असं डोनल बिष्ट सांगते.
  View this post on Instagram

  A post shared by Donal Bisht (@donalbisht)

  मुंबईतील लोक खोटं बोलतात त्यामुळं कोणावरही लगेच विश्वास ठेवणं योग्य नाही, याची जाणीव यावेळी मला आणि माझ्या कुटुंबीयांना झाली. मात्र माझं अभिनयावर असलेल्या प्रेमानं मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि बळ दिलं. अभिनय हे माझं पॅशन असल्याने हे पॅशन मला ऑडिशनपासून फार काळ दूर ठेवू शकलं नाही, असं डोनल बिष्ट सांगते. ‘यानंतर माझ्या आयुष्यात एक घटना घडली. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) एकाने चित्रपटातील रोलसाठी माझ्याकडे शय्यासुखाची मागणी करत, सोबत झोपण्यास सांगितलं. मात्र, माझं काम हे माझ्यासाठी पूजा असल्यानं मी त्या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. अजून थोडं स्ट्रगल बाकी असलं तरी मला विश्वास आहे की इंडस्ट्रीत मी माझा मार्ग निश्चित निर्माण करेन’, डोनल सांगते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Tv actress, Tv celebrities, Women safety

  पुढील बातम्या