मुंबई, 11 सप्टेंबर : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा अली खानला कोरोनाची लागण झाली आहे. सारानं या संदर्भात स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सारानं स्वत:ला होम क्वारंटाइन केल्याची माहिती मिळाली आहे.
सारानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे,' दुर्दैवानं आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचा सल्ला घेतल्यानंतर स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. लवकरच या कोरोनावर मात करीन'. साराच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. याआधी अर्जुन कपूर, मलायका अरोरा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. या स्टार्सनी त्यांच्या कोरोना पॉझिटिव्हबद्दल माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत शेअर केली.
'संतोषी मां सुनाएं व्रत कथाएं' शोमध्ये अभिनेत्री देवी पौलोमीची भूमिका साकारत आहे. सारा खानने एका निवेदनात म्हटले आहे की, “मी काही दिवस शुटिंगपासून ब्रेक घेतला कारण मला अस्वस्थ वाटत होतं. अस्वस्थता कमी होत नसल्यानं मी कोविड-19 ची चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं सध्या त्यावर मी डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरीच उपचार घेत आहे असं चाहत्यांना सांगितलं
मलायका आणि अर्जुन कपूर यांच्याही आधी 11 जुलैला प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सध्या या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.