Home /News /entertainment /

'कधी मुलगी नाही बघितली का'? कोणावर भडकली राखी सावंत'; हा VIDEO एकदा पाहाच

'कधी मुलगी नाही बघितली का'? कोणावर भडकली राखी सावंत'; हा VIDEO एकदा पाहाच

राखीने पर्ल व्ही. पुरीच्या (Pearl V. Puri) प्रकरणातदेखील आपलं मत व्यक्त केल आहे.

    मुंबई, 6 जून-   राखी सावंत(Rakhi Sawant)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसून येते. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ती पापाराझी सोबत कोणत्या ना कोणत्या विषयावर संवाद साधताना दिसून येते. नुकताच राखीने निशा रावल आणि करण मेहरा प्रकरणामध्ये आपलं मत मांडल होतं. त्यांनतर आत्ता राखीने पर्ल व्ही. पुरीच्या (Pearl V. Puri) प्रकरणात आपलं मत व्यक्त केल आहे. यावेळी ती पापाराझीला मुलाखत देत होती. दरम्यान एक व्यक्ती त्याच्याकडे बघत थांबला होता. ते पाहून राखीने त्या व्यक्तीला चांगलंचं ऐकवलं. नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राखी सावंत कोणत्याचं गोष्टीला घाबरत नाही. ती प्रत्येक गोष्टीत निडरपणे आपलं मत मांडते. नुकताच अभिनेता पर्ल व्ही. पुरीवर एका तरुणीने चक्क बलात्कार सारखा गंभीर आरोप लावला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटकसुद्धा केली आहे. याच प्रकरणाबद्दल राखी सावंतला विचारण्यात आलं होतं. त्यावेळी राखी सावंतने पर्ल व्ही. पुरीसोबत आपले फोटो दाखवत या आरोपांचं खंडन केल. आणि आपला या आरोपांवर विश्वास बसत नसल्याचं देखील सांगितलं. (हे वाचा:बलात्कार प्रकरणात निया शर्माने दिला पर्ल व्ही. पुरीला पाठींबा  ) ज्यावेळी राखी कॅमेरासमोर आपलं मत व्यक्त करत होती. समोर उभी असणारी एक व्यक्ती राखीकडे सतत एकटक  बघत होता. त्यामुळे राखी त्याचावर चांगलंचं संतापली. आणि आपल्या नेहमीच्या बिनधास्त स्टाईलमध्ये त्या व्यक्तीला म्हणाली, ‘ओ काका कधी मुलगी नाही बघितली का? जावा इथून माझ्याकडे काय बघत आहात. समोर बघा नाहीतर एक्सिडेंट होईल. असं राखी त्या व्यक्तीला ओरडते. तर पापाराझीला म्हणते तो माझ्याकडे बघत आहे. माझ्या कपड्यांकडे बघत आहे’. (हे वाचा:मधुबालाच्या प्रेमात होते दिलीप कुमार, मात्र या करणामुळे तुटलं नात  ) त्या व्यक्तीवर भडकल्या नंतर राखी आपलं बोलणं पूर्ण करते, पर्लबद्दल बोलताना राखीने म्हटलं आहे, ‘माझ्यासमोर देवाने जरी येऊन सांगितलं, तरी माझा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. तो खुपचं निरागस मुलगा आहे. मी पर्लसोबत एका कार्यक्रमात होते. मात्र तो महिलांकडे डोळेवर करून बघत देखील नाही. त्यामुळे कोणताही पुरावा नसताना एखाद्या व्यक्तीवर इतका मोठा आरोप लावणं चुकीचं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Rakhi sawant

    पुढील बातम्या