मुंबई, 22 मार्च: टीव्ही स्टार निया शर्मा (Nia Sharma) आपल्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर बोल्ड आणि बिंदास्त असणारी निया शर्मा तिचा नवीन शो 'जमाई राजा 2.0' (Jamai Raja 2.0) साठी चांगलीच चर्चेत आली होती. याआधीही 'ट्विस्टेड' (Twisted) या वेब सीरीजमुळे निया चर्चेत होती. आता निया तिच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
निया शर्माने 'ट्विस्टेड' या वेब सीरीजमध्ये एक लेस्बियन किस केला होता. एका मुलीसोबत अशा प्रकारचा किसिंग सीन दिल्यानंतर निया शर्माला आता त्या सीनमुळे दु: ख होतं आहे. एका मुलाखतीत नियाने त्या सीनबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. खरंतर 'ट्विस्टेड' ही वेब सीरिज रिलीज होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही या सीरीजमधील तो संबंधित सीन अजूनही चर्चेत आहे. या सीनमध्ये निया शर्मा आणि सह अभिनेत्री ईशा शर्माला किस करताना दिसत आहे. तिच्या या किसिंग सीनचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतं आहे.
View this post on Instagram
एका मुलाखतीत निया शर्माने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म फारसा प्रसिद्ध नव्हता, त्यावेळी मी ट्विस्टेड या वेब मालिकेत किसिंग सीन दिला होता. पण आज ओटीटीला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. निया शर्माने पुढं सांगितलं की, एका मुलीला किस करणं खूप विचित्र वाटलं होतं. वेब मालिकेत लेस्बियन किसिंग सीन दिल्यानंतर मला समजलं की, एखाद्या मुलाला किस करणं खूप सोपं आहे.
(वाचा - Nia Sharma ने भर रस्त्यात गाडी उभी करून केला 'फुल टू राडा'; पाहा व्हायरल VIDEO)
निया शर्मा ही टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नियाने 'एक हजारों में मेरी बहना है', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'जमाई राजा', 'पवित्र रिश्ता', 'कुबूल है', 'आप के आ जाने से', 'नागिन 3' आणि 'नागिन 5' यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत काम केलं आहे. त्याचबरोबर निया शर्मा अलीकडेच 'जमाई राजा 2.0' या वेब सीरीजमध्ये रवी दुबेसोबत झळकली होती. या वेब मालिकेतील किसिंग सीनमुळेही ती बरीच चर्चेत आली होती. याव्यतिरिक्त एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिने रवी दुबेचा उल्लेख बेस्ट किसर असाही केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tv actress, Web series