मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'शेमलेस निया', युजर्सच्या कमेंट्सवर निया शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

'शेमलेस निया', युजर्सच्या कमेंट्सवर निया शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा खुपचं लोकप्रिय आहे. ती सतत आपल्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा खुपचं लोकप्रिय आहे. ती सतत आपल्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा खुपचं लोकप्रिय आहे. ती सतत आपल्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 11 ऑगस्ट- अभिनेत्री निया शर्मा(Nia Sharma) छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा बनली आहे. एक बोल्ड अभिनेत्री अशी तिची ओळख बनली आहे. निया सतत आपल्या स्टाईल आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती सोशल मीडियावर आपले हॉट व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते. यावरून ती अनेकवेळा ट्रोलसुद्धा होते. नुकताच नियाने काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या ड्रेसमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या (Trolle) निशाण्यावर आली होती. मात्र यावेळी नियाने ट्रोलर्सला कडक शब्दात उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा खुपचं लोकप्रिय आहे. ती सतत आपल्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. तिला छोट्या पडद्यावरील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिचा प्रत्येक लुक तिच्या चाहत्यांना आवडतो. मात्र तिचा हा बोल्डनेस बऱ्याच लोकांना खटकतोदेखील. निया आपल्या या बिनधास्त अंदाजामुळे दिवसेंदिवस ट्रोल होतं असते.

(हे वाचा:वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले थक्क )

नियाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला होता. यामध्ये ती अतिशय बोल्ड अशा काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली होती. यामध्ये निया खूपच बोल्ड दिसून येत होती. चाहते तिचं कौतुक करत होते, तर काही युजर्स तिला नको त्या भाषेत ट्रोल करत होते. काही युजर्सनी कमेंट करत नियाला म्हटलं आहे, ‘हे पण कपडे काढ आणि मग व्हिडीओ बनव’, तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं होतं, ‘कपडे आहेत की नाहीत, शेमलेस निया’.

(हे वाचा:अखेर पवनदीपने अरुणीतासोबतच्या नात्यावर केला खुलासा;'Indian Idol 12'च्या मंचावर..  )

यासर्व कमेंट्सवर उत्तर देत नियाने याचं काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक व्हिडीओ शेयर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘बॅकलेस परिधान करताना, निष्काळजी बनू नका’, तसेच तिने त्या युजर्सच्या कमेंट्ससुद्धा मेन्शन केल्या आहेत.

First published:

Tags: Entertainment, Tv actress