'या' अभिनेत्रीच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटुंबाला व्हायरसची लागण

'या' अभिनेत्रीच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटुंबाला व्हायरसची लागण

अभिनेत्रीसह तिचा पती आणि सासू-सासरेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

  • Share this:

मुंबई, 01 जून : टीव्ही अभिनेत्री मोहिना कुमारी सिंगलाही (Mohena Kumari Singh) कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाली आहे. मोहेनाचं कुटुंबच कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. मोहिना कुमारीसह तिच्या कुटुंबातील 5 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमधीन मोहिनाला  प्रसिद्धी मिळाली होती. नुकतंच तिचं लग्न झालं. त्यानंतर आपल्या सासरच्या मंंडळींसोबत ती राहते आहे.

तिच्यासह पती, सासू-सासरे आणि कुटुंबातील इतर दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये दिसणारी लक्षणं सौम्य आहेत. त्यांना ऋषिकेशमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

GROCERY SHOPPING WEAR #thenewnormal

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari) on

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मोहिनानं सांगितलं, "सुरुवातीला तिच्या सासूला ताप आला. आधी त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली. त्यामुळे त्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र त्यानंतर त्यांचा ताप कमी होत नाही हे आम्हाला दिसलं. मग आम्ही सर्वांनीच कोरोना टेस्ट केली. आमच्या घरातील बहुतेकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निदान झालं, आमच्यात लक्षणं नव्हती"

हे वाचा - 'माझ्यासाठी प्रार्थना करा, लवकरच भेटू' वाजिद यांचा शेवटचा फोन कॉल Viral

मोहिना ही राजघराण्यातील आहे. मध्य प्रदेशातील रेवाचे राजा पुष्पराज सिंग यांची ती कन्या. रेवाची राजकुमारी असलेल्या मोहिनाचं नुकतंच लग्न झालं. हरिद्वारमध्ये थाटात तिचा विवाहसोहळा पार पडला.

हे वाचा - VIDEO: वाजिद यांच्या निधनानंतर VIRAL होतंय त्यांनी हॉस्पिटलमध्ये गायलेलं हे गाणं

दरम्यान, याधी बॉलीवूडमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. तर किरण कुमार यांनाही व्हायरसची लागण झाली होती. आता सगळे कोरोनामुक्त आहेत.

First published: June 1, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading