‘ए तू नाचणं थांबव, खूप वाईट नाचतेस…’ ट्रोलर्सच्या कमेंटवर अभिनेत्रीने दिली भन्नाट प्रतिक्रिया

तिने मराठी वेशभूषेत ओडिसी डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 03:56 PM IST

‘ए तू नाचणं थांबव, खूप वाईट नाचतेस…’ ट्रोलर्सच्या कमेंटवर अभिनेत्रीने दिली भन्नाट प्रतिक्रिया

मुंबई, 08 जून- टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंग गोयलने तिचा मराठी वेशभूषेत ओडिसी डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या व्हिडिओवरून दीपिकाला खूप ट्रोल केलं जात आहे. ती अतिशय वाईट नाचते.. नाचणं थांबव अशा अनेक कमेंट करून तिला ट्रोल करण्यात आलं. 'कवच २' या मालिकेतील लग्नाचा सीन सध्या दीपिका शूट करतेय. या शूटमधून वेळ काढून ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. यावेळीही तिने वॅनिटी व्हॅनमध्ये ओडीसी डान्सचा सराव करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने, ‘आध्यात्मिक सकाळ.. माझी सकाळ फास सुंदर झाली. कारण मी कवच मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढत ओडिसी डान्सचा सराव करते.’ दीपिका ओडिसी डान्सर असून गेल्या पाच वर्षांपासून ती ओडिसी डान्सचा सरावही करते.

कॅलिफोर्निया कॉन्सर्टमधील अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?Loading...


 

View this post on Instagram
 

Morning became beautiful while practicing Odissi Namami by snatching some time in btw of my Kawach Mahashivratri night shoots. Video credit @krishnasneha_kesharwani


A post shared by Deepika Singh Goyal (@deepikasingh150) on


या अभिनेत्याच्या लग्नाच्याच दिवशी झालं होतं वडिलांचं निधन, आता होतेय घटस्फोटाची चर्चा

एकीकडे तिचे चाहते तिच्या या कलेचं कौतुक करत आहेत तर काही युझरना तिचं हे नाचणं फारसं आवडलं नाही. एका युझरने लिहिले की, ‘नाचणं थांबव.. तू फार वाईट नाचतेस. १५ वर्ष तू ओडिसीची प्राथमिक गोष्टी शिकून घे. मग त्यानंतर परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न कर. कृपा करून महान कलेचा अपमान करू नकोस.’

दीपिकानेही या कमेंटवर उत्तर देत म्हटलं की, ‘तुमच्या बहुमुल्य रिअक्शनसाठी धन्यवाद. पण मी गेल्या पाच वर्षांपासून ओडिसी नृत्याचा सराव करतेय. सततचा सराव तुम्हाला परिपूर्ण करतो असं म्हटलं जातं त्यात तथ्य आहे. व्हिडिओ शेअर करतानाच मी हा फक्त सराव करतेय असं लिहिलं होतं.’ दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून तिचा चेहरा देशभरात घराघरात पोहोचला. आता एकता कपूरच्या ‘कवच २’ या मालिकेत ती दिसत आहे.

पत्नी अवंतिकाशी घटस्फोटाबद्दल इम्रानला विचारला प्रश्न, ही दिली पहिली प्रतिक्रिया

VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...